पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ती कशी उभी राहते; तिची पहिली प्रतिक्रिया आणि नंतर परिस्थितीचा सम्यक विचार केल्यावरचा तिचा दृष्टिकोन याचा आलेख दाखवणं मला महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे यात त्या व्यक्तीची झालेली वाढ दाखवता आली. तिच्याबरोबर प्रेक्षकांचाही असा प्रवास होणं महत्त्वाचं होतं. शेवट शोकांतिका न दाखवता (जे अनेक चित्रपट दाखवतात. उदा. ‘ब्रोकबॅक माउंटन') आम्ही अत्यंत सहिष्णु शेवट केला. समलिंगी नात्याला मान्यता असली पाहिजे असा स्पष्ट संदेश दिला. " " अशा विषयावर सिनेमा काढायला आर्थिक पाठबळ मिळणं खूप अवघड असतं. ओनीर (पटकथाकार, दिग्दर्शक : 'माय ब्रदर निखिल') म्हणाले, “आर्थिक पाठबळ मिळवणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सिनेमातल्या दोन्ही गोष्टी, समलैंगिकता व एचआयव्ही/एडस् 'टॅबू' (taboo) आहेत. फायनान्सर्सनी मला अनेक वेळा सांगितलं की समलिंगी पात्र भिन्नलिंगी कर आणि आम्ही तुम्हाला सिनेमासाठी पैसा देऊ. पण मला हे मान्य नव्हतं. माझ्या गोष्टीशी आणि निखिलशी मला प्रामाणिक राहायचं होतं. मी माझा हट्ट सोडला नाही. ' 27 अनेक नट समलिंगी भूमिका करायला तयार नसतात. आपण समलिंगी आहोत असा लोकांचा समज होईल ही एक भीती. एकदा समलिंगी व्यक्तीची भूमिका केली की कायम अशाच भूमिका मिळत राहतील, ही दुसरी भीती. त्यामुळे अशा भूमिका करायला तयार होणारे फार थोडे धाडसी कलाकार असतात. सेन्सॉर बोर्ड वेळ, कष्ट, पैसे खर्च करून सिनेमा काढला तर सेन्सॉर बोर्डाची कृपादृष्टी मिळवणं अवघड होऊ शकतं. श्रीधर रंगायन ('गुलाबी आयना' बद्दल बोलताना ) म्हणाले, “एक सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले ‘Why can't you say ' without saying it & show without showing it?' मी म्हटलं जे मी दाखवलं ते आवश्यक होतं. त्यांनी सर्टिफिकेट नाकारलं. Now it's mired in red tape." एकही लैंगिक दृश्य नसतानासुद्धा 'थांग' सिनेमाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळायला अडचण आली. संध्या गोखले म्हणाल्या, "जेव्हा सेन्सॉर बोर्डानी 'थांग' हा मराठी सिनेमा पाहिला तेव्हा अमोल (पालेकर) आणि मला सांगण्यात आलं की हे सगळं मराठी माणसाला न पटणारं आहे. तेव्हा आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही. ग्रँड ज्युरींना हा सिनेमा दाखवून निर्णय घेऊ. आम्ही विचारलं की, यात लैंगिक दृश्य नाहीत, भाषा अश्लील नाही तर मग सर्टिफिकेट नाकारायचं कारण काय? Give us your verdict in writing and we will pursue our legal course of action. विरोध विषयालाच होता. समलैंगिकतेचं अस्तित्व नाकारणं, ही वृत्तीच त्या मागे होती. इंद्रधनु. ७० ...