पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. याचा आतापर्यंत फार अभ्यास झालेला नाही. Text often speak in multiple languages and a rereading needs to be done." (लैंगिकता हा विषय विचारात घेऊन परत मराठी वाङ्मयाचं वाचन होणं गरजेचं आहे). नाटक समलिंगी विषयांवरची व्यावसायिक नाटकं काढणं आर्थिकदृष्टया परवडणारं नसतं, पण प्रायोगिक रंगभूमीतून कमी पैशात चौकटीबाहेरची नाटकं बसवता येतात. समलिंगी विषयावर असलेली अनेक मराठी नाटकं ही प्रायोगिक रंगभूमीने पुढे आणली आहेत. विजय तेंडुलकरांचं 'मित्राची गोष्ट', सुनील खानोलकरांचं 'हॅपी बर्थडे', महेश एलकुंचवार यांचं 'होळी', गौरी देशपांडे यांच्या एका छोट्या गोष्टीवर आधारित राजश्री सावंत-वाड यांचं 'जावे त्याच्या वंशा', चेतन दातार यांचं '१ माधव बाग', सचिन कुंडलकर यांचं 'छोट्याशा सुट्टीत' ही या विषयावरची काही नाटकं. समलिंगी विषय असलेल्या नाटकांवर 'द ड्रॅमॅटिक परफॉरमन्सेस अॅक्ट १८७६ ची टांगती तलवार असल्यामुळे हा विषय फार जपून मांडावा लागतो. प्रायोगिक रंगभूमी असल्यामुळे यातल्या बहुतेक कलाकृती पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातच सादर होतात. छोट्या शहरात, गावोगांवी पोहचू शकत नाहीत. मी 'समलिंगी विषया'वरची पुस्तकं, नाटकं, सिनेमे, असं लिहिलं असलं तरी सगळ्या लेखकांना असं लेबल लावणं मान्य असतंच असं नाही. सचिन कुंडलकर (नाटककार : छोट्याशा सुट्टीत ) म्हणाले, "मला नाटक, सिनेमा किंवा कुठल्याही कलाकृतीला 'गे' किंवा कुठलंही लेबल लावणं मान्य नाही. कुठल्याही कलाकृतीला आपण असं लेबल लावू शकत नाही. माझ्या लिखाणात, नाटकात, समलिंगी पात्रं सहजपणे येतात. मला मुद्दामहून काही विशिष्ट स्टँड घ्यायचा म्हणून ती पात्रं येत नाहीत. माझ्यासाठी समलिंगी लोकांचा 'बायकी' स्टिरिओटाईप आणि अॅक्टिव्हिस्ट लोकांचा 'आपण किती वंचित आहोत!' हा स्टिरिओटाईप या दोन्हीही तितक्याच हास्यास्पद वाटतात." टेलिव्हिजन टीव्हीच्या मालिकांमध्ये समलिंगी विषयाचे फार क्वचित उल्लेख असतात. श्रीधर (दिग्दर्शक : 'गुलाबी आयना') म्हणाले, "टीव्ही सध्या फक्त मास ऑडियन्स, महिलाप्रधान फेजमध्ये आहे.... कोणीही काहीही वेगळं देण्याचा प्रयत्न करत नाही... 'गे' इशू तर बाजूलाच" (समलिंगी जीवनशैलीवर मालिका नसल्या तरी मराठी मालिकांमध्ये, नाटकांत, सिनेमांत, पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी बायकी पुरुषांची पात्रं विनोद आणि टवाळीसाठी सर्रास वापरलेली दिसतात.) इंद्रधनु... ६८