पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असल्यामुळे ते भारतीय लोकांपर्यंत पोहोचणं अवघड होत होतं. १९९० साली भारतात, अशोक राव कवी यांनी समलिंगी लोकांसाठी 'बॉम्बे दोस्त' हे इंग्रजी मासिक काढलं. त्याला खूप चांगली मागणी होती पण काही तांत्रिक अडचणींमुळे काही वर्षांनी हे मासिक बंद पडलं. brikone MAGAZINE htoes Dear Mummy and Papa I have something to tell you.... BORN GAY THE GENE GENERATION 2 Rtd) a भाषा समलिंगी विषयावरचं बरंचसं साहित्य इंग्रजीत आहे (उदा. सुनीती नामजोशी, होशंग मर्चंट, गीती थदानी, अश्विनी सुकथनकर, रूथ वनिता, हनिफ कुरेशी, सलीम किडवाई, महेश दत्तानी यांचं लिखाण ). याला अनेक कारणं आहेत- यातले बहुतेक लेखक इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत; अशा विषयाच्या इंग्रजी पुस्तकाला प्रकाशक मिळणं सोपं जातं; सबंध भारतातील इंग्रजी वाचकांपर्यंत पोचता येतं इ. बहुतेक भारतीय लोकांना फक्त स्थानिक भाषा येते. म्हणून स्थानिक भाषांतून विविध विचार मांडणं आवश्यक आहे. त्याशिवाय ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत व हा एक 'इलिटिस्ट' विषय म्हणून ओळखला जाईल. मराठीत समलैंगितेवर फार थोडं लिखाण आहे. यातलं काही लिखाण समलिंगीव्देष्टं आहे. हल्ली या विषयाकडे संवेदनशीलतेने बघणाऱ्या 'तृष्णा' (लेखक - सुमेध रिसबुड- वडावाला), 'हे दुःख कुण्या जन्माचे!’ (मंगला आठलेकर), 'पार्टनर' (बिंदुमाधव खिरे), 'कोबाल्ट ब्लू' (सचिन कुंडलकर) यासारख्या कादंबऱ्या समोर येऊ लागल्या आहेत. स्थानिक भाषेतलं फार थोडं साहित्य लैंगिकतेच्या अंगानं वाचलं गेलं आहे. सलीम किडवाई म्हणाले, "गे विषयाबद्दल मी नाही सांगू शकत पण, प्राथमिक संशोधनातून दिसून आलंय की जवळपास सगळ्या भाषेतून क्वीअर (Queer) साहित्य इंद्रधनु ६७ ...