पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिओशन असं आवाहन करीत आहे की, मानसोपचारतज्ज्ञांनी समलिंगी मानसिकतेला फार पूर्वीपासून जोडलेला मनोरुग्णतेचा कलंक काढून टाकण्यात पुढाकार घ्यावा. समलिंगी संबंधांमध्ये ज्यांचा सहभाग होता अथवा आहे अशांच्या बाबतीत नोकरी, घर, सार्वजनिक निवास आणि परवाना देणं (लायसन्स देणं) यासारख्या क्षेत्रांमधे केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिओशनला खेद वाटतो. तसेच निर्णयक्षमता, कार्यकुशलता, विश्वासार्हता या बाबींमध्ये इतर सामान्य व्यक्तींना जे निकष लावले जातात त्यापेक्षा अधिक निकष या व्यक्तींना लावले जाऊ नयेत. तसंच, परस्पर संमतीने खासगी जागेत केलेल्या समलिंगी संबंधांच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या भेदभावाचा कायदा रद्द करण्यात यावा. यास अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिओशनचा पाठिंबा असून तशी त्यांची विनंती आहे.' १९८१ मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशननी समलैंगिकतेला आजाराच्या यादीतून काढून टाकलं. याचा अर्थ आता पाश्चात्त्य देशात सगळे मानसोपचारतज्ज्ञ समलैंगिकतेला आजार मानत नाहीत असं अजिबात नाही. त्यांच्या वादातून समलैंगिकतेला दोन भागात विभागण्यात आलं. इगो सिंटोनिक / इगो डिस्टोनिक समलैंगिकता. ज्या व्यक्तींना आपण समलिंगी आहोत याचा काही त्रास होत नाही, जे आपली लैंगिकता स्वीकारतात अशांना इगोसिंटोनिक म्हणतात. यांचा लैंगिक कल बदलण्याचे प्रयत्न करू नयेत असं काहींचं मत पडलं. ज्या समलिंगी व्यक्तींना आपली लैंगिकता स्वीकारण्यास त्रास होतो, अशांना इगो डिस्टोनिक असं म्हणतात. अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं काही मानसोपचारतज्ज्ञ मानतात. या विचासरणीवरून ICD10 मध्ये इगो डिस्टोनिक लैंगिक कलासाठी F66.1 प्रवर्ग करण्यात आला. (55) (काही मानसोपचारतज्ज्ञांना हे प्रवर्ग मान्य नाहीत. सगळे समलिंगी आजारी आहेत असं त्यांचं मत आहे.) भारतातील परिस्थिती आजही भारतातले बहुतेक मानसोपचारतज्ज्ञ समलैंगिकतेला आजार मानतात. ही लैंगिकता बदलायचा प्रयत्न केला पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका असते. या भूमिकेमागे संस्कृतीचा पगडा, जुनी शिक्षणप्रणाली, व्यावसायिक दृष्टिकोन अशी अनेक कारणं आहेत. मानसोपचारतज्ज्ञही सनातनी संस्कृतीच्या चौकटीतच वाढले आहेत. स्वतंत्र विचार करायची, एखादी नवीन विचारप्रणाली तपासून बघायची सवय जशी इतरांची नाही तशी त्यांचीही नाही. मी जेव्हा माझ्या संस्थेचा प्रसार करायला मानसोपचारतज्ज्ञांना इंद्रधनु ६२ ...