पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मॅग्नस हर्चफेल्ड यांचं निधन झालं. १९३३ ते १९४५ च्या दरम्यान जर्मनीमधल्या हजारो समलिंगी पुरुषांना छळछावण्यांमध्ये पाठवण्यात आलं. त्यात अनेकजण दगावले. या छळछावण्यांत समलिंगी कैद्यांना ओळखण्यासाठी एक गुलाबी त्रिकोण त्यांच्या कपड्यावर लावलेला असायचा. म्हणून कालांतराने गुलाबी त्रिकोण, समलिंगी अधिकारांच्या चळवळीत समलिंगी अभिमानाची निशाणी बनला. विसावं शतक समलिंगी आकर्षण निर्माण होण्यामागच्या मानसिक कारणांचा शोध डॉ. सिग्मन्ड फ्रॉईड (१८५६ - १९३९) यांनी घेतला. त्यांनी समलिंगी बनण्यामागचे वेगवेगळे सिद्धांत मांडले. डॉ. फ्रॉईड यांच्या मनात समलैंगितेबद्दल थोडा तिढा असला तरी समलैंगिकता ही विकृती नाही व समलिंगी पुरुष, स्त्रिया त्यांच्या जीवनशैलीत राहून चांगल्या तऱ्हेने आयुष्य जगू शकतात, अशी त्यांची धारणा होती. जसजशी लोकांच्या ज्ञानात भर पडत गेली तसतसे त्यांचे विचार हळूहळू बदलू लागले. १९४८ साली गोर विडाल यांनी 'द सिटी ॲण्ड द पिलर' हे समलिंगी विषयावरचं पुस्तक लिहून अमेरिकेत खळबळ उडवली. याच साली डॉ. अल्फ्रेड किनसे यांनी समलिंगी संभोग हे लोकांना वाटतं तेवढं दुर्मीळ नाही हे आपल्या सर्वेक्षणातून दाखवून दिलं. १९२४ साली शिकागोमध्ये 'सोसायटी फॉर ह्युमन राइट्स' ची स्थापना हेन्री गर्बर यांनी केली. ही संस्था फार काळ टिकू शकली नाही. नंतर १९५० साली लॉस एंजलिसमध्ये समलिंगी पुरुषांसाठी 'मॅलॅचिन सोसायटी'ची स्थापना झाली. १९५५ साली सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये 'डॉटर ऑफ बिलीटीस' ही लेस्बियन अधिकारासाठी झटणारी संस्था स्थापन झाली. सुरुवातीला या संस्थासुद्धा समलैंगिकतेला आजार मानत होत्या. समलिंगी असल्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्टया कमी आहोत आणि आपण परिपूर्ण आयुष्य जगण्यास कमी पडतो ही त्यांची धारणा होती. आपल्याला कसं बदलता येईल असा विचार होत होता. तर काही समलिंगी कार्यकर्त्यांची भूमिका खूप वेगळी होती. त्यातला एक फ्रॅन्क कामेनी. कामेनीचं मत होतं- जसं आपल्याला लोक भिन्नलिंगी का होतात हे माहीत नाही तसंच काही लोक समलिंगी का होतात हे माहीत नाही, भिन्नलिंगी व्यक्तीला ती व्यक्ती भिन्नलिंगी का आहे? हा प्रश्न पडत नाही, अफ्रिकन माणसाला त्यांच्या कातड्याचा रंग काळा का आहे? हा प्रश्न भेडसावत नाही. त्यांनी स्वतःला स्वीकारलं आहे. त्यामुळे आपण समलिंगी का आहोत याच्यावर विचार करायचं काहीही कारण नाही. इंद्रधनु... ६०