पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैद्यकीय दृष्टिकोन - आजार ते वेगळेपण प्राचीन काळात समलिंगी वर्तन पाप समजलं जात होतं. त्यावरून समलिंगी वर्तन कायद्याने गुन्हा झाला. एकोणीसाव्या शतकापासून या विषयावर वैद्यकीय विचार व्हायला लागला. सुरुवातीला समलैंगिकता विकृती आहे असं सर्व डॉक्टरांचं मत होतं. ही मानसिकता बदलली पाहिजे असंच त्यांचं मत होतं. समलिंगी लोकांचा कल बदलण्यासाठी शस्त्रक्रिया, औषधं, शॉक थेरपी, मोहिनी विद्या, काऊन्सेलिंगचा वापर झाला. या प्रयत्नांना यश आलं नाही. कालांतराने मानसोपचारतज्ज्ञ मानू लागले की, लैंगिक कल बदलता येत नाही. एका बाजूने हे प्रयोग चालू असताना दुसरीकडे समलिंगी कार्यकर्त्यांनी त्यांच्या अधिकारांची चळवळ सुरू केली. समलैंगिकता हे वेगळेपण आहे, आजार किंवा विकृती नाही, म्हणून आजारांच्या यादीतून समलिंगी कलाला वगळावं अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. बराच काळ लढा दिल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं. आज अमेरिकन सायकिअॅट्रिस्ट असोसिएशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्युएचओ) समलिंगी असणं आजारपण मानत नाहीत. आकृती १ : वैद्यकीय प्रवास समलिंगी वर्तन हे पाप समजलं जात होतं समलिंगी वर्तन गुन्हा समजला जात होता/(काही देशात अजून समजला जातो) समलैंगिकता विकृती आहे असं मानलं गेलं (१८ वं शतक) समलैंगिकतेवर अभ्यास सुरू झाला समलैंगिकतेला आजार मानू नये समलिंगी लोकांचा लैंगिक कल बदलण्याचे प्रयत्न म्हणून समलिंगी कार्यकर्त्यांची चळवळ समलिंगी व भिन्नलिंगी व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास स्टोनवॉलची दंगल : १९६९ समलैंगिकता हा आजार नाही अमेरिकन सायकिअॅट्रिस्ट असोसिशन : १९७३ समलैंगिकता हा आजार नाही अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिशन : १९७५ समलैंगिकता हा आजार नाही (डब्लू.एच.ओ.) : १९८१ समलैंगिकतेचं विभाजन इगोसिंटोनिक -इगोडिस्टोनिक (ICDIO) (F66.1)) इंद्रधनु ५८ ...