पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान मुला/मुलींचं लैंगिक शोषण कोणत्या कारणांनी होतं? १) काहीजण लहान मुला/मुलींकडे 'सेक्स ऑबजेक्ट' म्हणून बघतात. लैंगिक सुख मिळवण्याची एक वस्तू म्हणून त्यांचा वापर करतात. लहान मुला/मुलींना आमिष दाखवून, गोड बोलून किंवा भीती दाखवून त्यांचा लैंगिक उपभोग घेतात. २) काही जणांना लहान मुला/मुलींबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. अशा आकर्षणाला 'पेडोफिलिया' म्हणतात, व अशा व्यक्तींना 'पेडोफाइल्स' म्हणतात. पेडोफिलिया आणि समलैंगिकता यांचा काहीही संबंध नाही. समलिंगी व्यक्तींना लहान मुलांबद्दल अजिबात लैंगिक आकर्षण नसतं. अल्पवयीन मुलां/मुलींचं लैंगिक शोषण करणं हा कायद्याने गुन्हा आहे व तो असलाच पाहिजे. (त्या मुलांना/मुलींना जरी त्यावेळी हे लैंगिक संबंध आवडत असले तरी त्याचा अर्थ समजण्याची, त्याच्यासाठी अनुमती देण्याची प्रगल्भता त्यांच्यात नसते; त्याचबरोबर लहान वयात त्यांच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली नसते. म्हणून या संबंधाना त्यांची संमती आहे किंवा नाही याला काहीही अर्थ उरत नाही.) O इंद्रधनु . ५७ ...