पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या सर्वेक्षणामुळे पहिल्यांदा लोकांसमोर समलैंगिकता आणि उभयलैंगिकतेबद्दल आकडेवारी उपलब्ध झाली. समाजाच्या कल्पनेपेक्षा जास्त प्रमाणात समलिंगी, उभयलिंगी संबंध होतात हे वाचून अमेरिकन लोकांच्या लैंगिकतेच्या कल्पनांना मोठा धक्का बसला. वास्तविक पाहता आश्चर्य वाटायचं काही कारण नव्हतं, कारण जगाच्या इतिहासात होऊन गेलेल्या अनेक थोर व्यक्ती समलिंगी किंवा उभयलिंगी होत्या. उदा. सोफोक्लीस, अॅलेक्ॉन्डर द ग्रेट, रिचर्ड द लायन हाटेंड, किंग जेम्स - १, फ्रेड्रिक द ग्रेट, वॉल्ट व्हिटमन, पीटर इलीच चायकोव्हस्की, लिओनारडो दा विंसी, ऑस्कर वाईल्ड, आंद्रे गीड, अॅलन ट्यूरिंग, ख्रिस्तोफर आयशरवुड, टेनिसी व्हिल्यम्स इत्यादी. पण हा विषय लोकांना इतका अस्वस्थ करणारा होता की लोकांनी शतकानुशतके प्रयत्नपूर्वक हा विषय नजरेआड केला होता. डॉ. किनसे यांच्या सर्वेक्षणांनी लोकांना परत वास्तव दाखवून दिलं. या सर्वेक्षणाचा चिकित्सक अभ्यास करताना उणिवा दिसून आल्या. यानंतर अनेकांनी अशा त-हेची सर्वेक्षणं केली. वेगवेगळे आकडे समोर आले. भारतातही लैंगिकतेवर काही सर्वेक्षणं झाली. या सर्वेक्षणातून समलिंगी लैंगिक कल, समलिंगी लैंगिक वर्तन, समलिंगी समाजाच्या समस्यांची माहिती मिळाली. [49] आपल्या लैंगिक इच्छा समाजच्या नीतिमत्तेत बसत नसल्या तर अशा गोष्टी भीतीपोटी, लाजेपोटी बोलल्या जात नाहीत. म्हणून बहुतेकजण लैंगिक कल, लैंगिक इच्छा, वर्तनाबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. सर्वेक्षण पूर्वग्रहदूषित असेल तर आकडे, निष्कर्ष चुकीचे निघू शकतात. या सगळ्या कारणांमुळे समलिंगी लैंगिक कल, वर्तनाची नक्की टक्केवारी सांगणं अवघड आहे. अंदाज असा लावला जातो की, जगात ३% पुरुष पूर्णपणे समलिंगी कलाचे असतात तर १% स्त्रिया पूर्णपणे समलिंगी कलाच्या असतात. [501 विशेष उल्लेख : लहान मुलांचं लैंगिक शोषण अनेक वेळा काही लहान मुलींचं किंवा लहान मुलांचं एखादी वयाने मोठी असलेली व्यक्ती (बऱ्याच वेळा दिसतं की, ही व्यक्ती ओळखीची असते) लैंगिक शोषण करते. लैंगिक शोषणाचे अनेक प्रकार आहेत. लैंगिक स्पर्श, लैंगिक अवयवांचं प्रदर्शन, मैथुन इ. अशा लैंगिक शोषित मुला/मुलींना त्या वयात आपल्याबरोबर काय केलं जातंय याची समज नसते (काहींना तो शरीरस्पर्श आवडतो). हळूहळू जस जशी मुलं/मुली मोठी होतात तस तसं त्यांना या शोषणाची जाणीव व्हायला लागते. याचा त्यांना खूप मानसिक क्लेश होतो. अनेकांच्या भावी आयुष्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. . इंद्रधनु ५६ ... al