पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६. प्रायोगिक लैंगिक संबंध (Experimental Sex) वयात आल्यावर जेव्हा शरीरसुख घ्यायची इच्छा उत्पन्न होते, तेव्हा प्रायोगिक तत्त्वावर समलिंगी संभोग होऊ शकतो. उदा. आपल्या मित्राबरोबर, बोर्डिंग स्कूलमधल्या रूममेट बरोबर इ. ही एक तात्पुरती अवस्था असू शकते. याचा अर्थ असा की, या वयात समलिंगी संभोग झाला म्हणजे ती व्यक्ती समलिंगी लैंगिक कलाची आहे असा तर्क काढणं चुकीचं होईल. पहिला लैंगिक संबंध एखाद्या व्यक्तीचा पहिला लैंगिक अनुभव समलिंगी आहे का भिन्नलिंगी आहे या वरून त्या व्यक्तीचा लैंगिक कल ठरवता येत नाही. काही पुरुषांचा पहिला लैंगिक अनुभव भिन्नलिंगी असतो पण नंतर हळू हळू त्यांना पुरुष आवडायला लागतात. एक जण म्हणाला, “कॉलेजमध्ये असल्यापासून मला अनेक गर्लफ्रेंड्स आहेत. अनेकींबरोबर मी झोपलो आहे. पण हळूहळू मला पुरुषांबद्दल आकर्षण वाटायला लागलं, कसं ते ठाऊक नाही. मग मी एका बरोबर सेक्स केला. आता मला पुरुषंच आवडतात. पुरुषांपासून जे सुख मिळतं ते स्त्रीपासून मला मिळत नाही.' तर काही भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या पुरुषांचा पहिला लैंगिक अनुभव समलिंगी असतो, पण नंतर त्यांना समलिंगी आकर्षण अजिबात राहत नाही. “मी मुलांच्या होस्टेलमध्ये वाढलो. रूममेटबरोबर अनेक वेळा सेक्स केला. तेव्हा तो आवडलाही पण एका स्टेजनंतर मला स्त्रियाच आवडायला लागल्या. आता माझं लग्न झालेलं आहे. मला पुरुषांबद्दल अजिबात आकर्षण वाटत नाही." डॉ. आल्फ्रेड किनसेंची प्रमाणपट्टी (Dr. Kinsey Scale) १९४८ मध्ये अमेरिकेत डॉ. आल्फ्रेड किनसे यांनी पुरुषांच्या लैंगिक वर्तनाचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला. अमेरिकेतल्या किती पुरुषांनी भिन्नलिंगी, उभयलिंगी, समलिंगी संबंध ठेवले आहेत, किती जणांनी असे संबंध ठेवले नाहीत पण त्यांना उभयलिंगी, समलिंगी शारीरिक आकर्षण वाटलं अशा अनेक गोष्टींची माहिती सर्वेक्षणातून गोळा केली. त्यांनी याच धर्तीवर नंतर स्त्रियांवरही एक सर्वेक्षण केलं. या अभ्यासासाठी त्यांनी एक प्रमाणपट्टी तयार केली. त्याला डॉ. किनसे प्रमाणपट्टी म्हणतात. या प्रमाणपट्टीत ते ६ असे सात भाग आहेत. ० म्हणजे पूर्णपणे भिन्नलिंगी, ६ म्हणजे पूर्णपणे समलिंगी आणि मधले आकडे म्हणजे उभयलिंगी. त्यांनी ज्या ज्या व्यक्तींची मुलाखत घेतली त्या व्यक्ती या प्रमाणपट्टीवर कुठे बसतात याचा अंदाज घेतला. . इंद्रधनु ... ५५