पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काहींची धारणा आहे की, उभयलिंगी व्यक्ती सगळ्या समलिंगी लैंगिक कलाच्या असतात पण उभयलिंगी लैंगिक कलाच्या आहोत असं ढोंग करतात. काही समलिंगी व्यक्ती आपण उभयलिंगी आहोत असं ढोंग करत असल्या तरी सगळ्या उभयलिंगी व्यक्तींबद्दल असं विधान करणं बरोबर नाही. अनेक जण उभयलिंगी असतात. त्यात कोणतंही ढोंग किंवा दुटप्पीपणा नसतो. ३. परिस्थितीजन्य समलिंगी लैंगिक वर्तन (Homosexual Behavior due to Circumstance) काही भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या पुरुषांना काही विशिष्ट परिस्थितीत स्त्री जोडीदार मिळायला अडचण येते. अशा वेळी हे पुरुष गरज भागवण्यासाठी दुसऱ्या पुरुषाबरोबर संभोग करू शकतात. उदा. १. रवीचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे. त्याला एका गुन्ह्यासाठी पाच वर्ष कैदेची शिक्षा झाली आहे. तुरुंगात असताना त्याला त्याच्या शारीरिक इच्छा पुऱ्या करण्यासाठी स्त्री मिळणं शक्य नव्हतं. अशा वेळी कैदेतच त्याने गरज भागविण्यासाठी तुरुंगातील दुसऱ्या पुरुषाबरोबर संभोग केला. या उदाहरणात रवीचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे पण कैदेत असताना लैंगिक वर्तन समलिंगी आहे. उदा. २. सचिनचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे. त्याचं लग्न झालं आहे. सचिनला मुखमैथुन करून घ्यायला खूप आवडतं. त्याच्या बायकोला मुखमैथुन करायला अजिबात आवडत नाही. म्हणून तो त्याच्या माहितीच्या एका पुरुषाकडून मुखमैथुन करून घेतो. या उदाहरणात सचिनचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे पण लैंगिक वर्तन उभयलिंगी आहे. ४. काही इंटरसेक्स व्यक्ती काही इंटरसेक्स व्यक्ती स्वत:ला पुरुष मानतात व यातल्या काही जणांना पुरुषांबद्दल भावनिक व शारीरिक आकर्षण असतं. ५. ट्रान्सजेंडर जे पुरुष स्वत:ला स्त्री समजतात व पुरुषांकडे आकर्षित होतात ते एमएसएम समूहात येतात. (स्वत:ला स्त्री मानत असल्यामुळे या गटातील काही जण स्वत:ला एमएसएम समूहातले मानत नाहीत). (समलैंगिकता व ट्रान्सजेंडर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समलैंगिकता हा लैंगिक कलाचा एक प्रकार आहे. ट्रान्सजेंडर हा लिंगभावाचा प्रकार आहे.) इंद्रधनु ... ५४