पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असा शब्द वापरात आला. एमएसएम म्हणजे पुरुषांबरोबर संभोग करणाऱ्या पुरुषांचा समूह. या समूहाचे अनेक प्रवर्ग आहेत- समलिंगी, उभयलिंगी, परिस्थितीजन्य समलिंगी लैंगिक वर्तन करणारे, ट्रान्सजेंडर, काही इंटरसेक्स व्यक्ती व प्रायोगिकदृष्ट्या लैंगिक संबंध करणारे. एमएसएम प्रवर्ग १. समलिंगी (Homosexual) अशा व्यक्तींचं भावनिक व शारीरिक आकर्षण त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल असतं. हे आकर्षण कालांतरानी बदलत नाही (भिन्नलिंगी किंवा उभयलिंगी बनत नाही), बदलता येत नाही. समलिंगी पुरुषांची शारीरिक रचना इतर पुरुषांसारखीच असते. (तसंच समलिंगी स्त्रियांची शारीरिक रचना इतर स्त्रियांसारखीच असते). बहुतेक समलिंगी पुरुष समाजाला घाबरून आपली लैंगिकता लपवून ठेवतात. यातले काही जण लाजेपोटी पुरुषाबरोबर कधीही संभोग करत नाहीत. काही जण फक्त पुरुषांशीच नाती जोडतात. त्यांचा लैंगिक कल समलिंगी असतो व लैंगिक वर्तनही समलिंगीच असतं. - काही जण स्त्रीशी लग्न करतात व फक्त त्या स्त्रीबरोबर संभोग करतात. अशा व्यक्तींचा लैंगिक कल समलिंगी आहे पण लैंगिक वर्तन (नाइलाजाने) भिन्नलिंगी आहे. - काही जण स्त्रीशी लग्न करतात व बाहेर पुरषांबरोबर लैंगिक संबंध ठेवतात. अशांचा लैंगिक कल समलिंगी आहे पण लैंगिक वर्तन उभयलिंगी आहे (घरी बायकोबरोबर व बाहेर पुरुषांबरोबर संभोग होतो). - समलिंगी पुरुष एखाद्या जोडीदराबरोबर इन्सर्टिव्ह भूमिका घेऊ शकेल किंवा रिसेप्टिव्ह भूमिका घेऊ शकेल किंवा व्हरसटाइल भूमिका घेऊ शकेल. कोणती भूमिका घ्यायची हे त्यांच्या मानसिकतेवर, त्यांच्या त्यावेळच्या लैंगिक इच्छेवर व स्वप्नरंजनावर अवलंबुन असतं. २. उभयलिंगी (Bisexual) अशा व्यक्तींचं भावनिक व शारीरिक आकर्षण पुरुष व स्त्रिया या दोन्हीबाबत असतं. उभयलिंगी पुरुषांची शारीरिक रचना इतर पुरुषांसारखीच असते. (तसंच उभयलिंगी स्त्रियांची शारीरिक रचना इतर स्त्रियांसारखीच असते). - बहुतेकजण आपण उभयलिंगी आहोत हे सांगत नाहीत व लग्न करतात कारण त्यांना विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींबद्दल कमी/जास्त प्रमाणात आकर्षण असतं. इंद्रधनु ५३