पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या कायद्याच्या समांतर असलेला लष्करातील कायदा समलिंगी वर्तन करणाऱ्या लष्करातील व्यक्तींवर खटला दाखल होऊन कैद होऊ शकते. [42] समलिंगी लैंगिक वर्तन करणाऱ्या व्यक्ती लष्करात आल्या तर सैन्याचं मनोबल खचेल, अराजकता माजेल ही यामागची भीती असते. समलिंगी लोकांना लष्करात भरती न करण्याचा कायदा पूर्वी ब्रिटनमध्येही होता. हा कायदा समलिंगी लोकांवर अन्याय करणारा आहे, हे जाणून २००० साली, ब्रिटनमध्ये तो बदलण्यात आला. आता ब्रिटनमध्ये समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती होता येतं. [43] प्रत्येकाची लैंगिक आवड, आकर्षण व प्रेम व्यक्त करायची पध्दत वेगळी असते. सगळ्यांनी सगळ्या प्रकारची नाती, लैंगिक सुखाच्या पद्धती अनुभवल्या पाहिजेत किंवा त्यांना त्या आवडल्या पाहिजेत असा अजिबात हट्ट नाही. पण जर काही जोडीदारांना समलिंगी संबंध आवडत असतील (किंवा काही भिन्नलिंगी जोडीदारांना मुखमैथुन, गुदमैथुन आवडत असेल) तर ती त्यांची खाजगी बाब आहे असा विचार कायद्याने व समाजाने करावा. , o O इंद्रधनु ... ४६