पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3) आपले लिंग घालताना पाहण्यात आले. काही जनावरांमध्ये दोन नरांमध्ये गुदमैथुन होतो तसं इथे (या माकडांत) दिसून आलं नाही." [41] इतके दिवस जनावरात समलैंगिकता आढळते हे माहीत नव्हतं तोवर, 'प्राण्यांना सुद्धा जे कळतं ते हे ‘या असल्या लोकांना कळत नाही', असं बोललं जायचं. आता, 'पण ती जनावरं आहेत. आपण जनावरं आहोत का? त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक?' असं बोललं जातं. प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ लावतो. जे उपजत येतं ते नैसर्गिक? काही जणांचं म्हणणं आहे की समलिंगी आकर्षण हा निवडलेला पर्याय आहे. ही समजूत साफ चुकीची आहे. समलिंगी कल उपजत येतो. तो काही शिकवता येत नाही. हे जर आकर्षण उपजत आहे तर समलिंगी संभोग करण्याची इच्छा होणंही स्वाभाविक आहे पण ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे की, आपली आवड, गरज पुरी करताना जोडीदार प्रौढ आहे व दोघांची या संबंधांना संमती आहे. दोन प्रौढ व्यक्तींनी संमतीने मुखमैथुन किंवा गुदमैथुन केला तर कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा का असावा? कोणावर अन्याय घडतो आहे? कोणता अन्याय होतो आहे? अनेक जण ही भीती व्यक्त करतात की, सगळे समलिंगी झाले तर मनुष्यच नष्ट होईल. याला उत्तर असं की, थोडे जण समलिंगी असतात, काही जण उभयलिंगी असतात व बहुतांशी भिन्नलिंगी असतात. त्यामुळे ही भीती अवास्तव आहे. याच बरोबर असाही विचार करावा की आताची जनसंख्या बघता, त्या जनसंख्येमुळेच सगळी पृथ्वी नष्ट होईल याची भीती निर्माण झाली आहे. समलिंगी जोडप्यांना मुलं होणार नाहीत म्हणून एक प्रकारे जनसंख्येला आळा घालण्यास थोड़ी का होईना मदत नाही का होणार? गंमतीची गोष्ट अशी की जेव्हा कुटुंबनियोजनाच्या कामाला सुरुवात झाली तेव्हाही हीच भीती व्यक्त करण्यात आली होती. मनुष्य व जनावरांचा संभोग समलिंगी संभोग व माणसाने जनावराबरोबर केलेला संभोग कायदा एकाच मापदंडाने मोजतो. पुरुष किंवा स्त्री एखाद्या जनावराबरोबर संभोग करतात तेव्हा जनावराची संमती घेतलेली नसते (ती घेता येत नाही). दोन प्रौढ समलिंगी पुरुषांनी (किंवा दोन प्रौढ समलिंगी स्त्रियांनी) जर एकमेकांच्या संमतीने संभोग केला तर त्याला का अडचण यावी? दुसरी गोष्ट- मनुष्य व जनावर वेगळ्या जातीचे (Species) आहेत. दोन पुरुष (किंवा दोन स्त्रिया) वेगवेगळ्या जातीचे (Species) कसे काय? एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला दुसऱ्या जातीचा (Species) म्हणतो का? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला दुसऱ्या जातीची (Species) मानते का? म्हणून माणूस व जनावर यांच्यामध्ये होणाऱ्या संभोगाचा कायद्याने स्वतंत्र विचार करावा. इंद्रधनु ... ४५ !