पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निसान ज्या कार्यासाठी जे अवयव दिलेले आहेत ते त्याच कारणांसाठी वापरणं निसर्गाने जो अवयव ज्या कामासाठी दिला आहे तो अवयव त्याच कारणासाठी वापरायचा अशी काहींची धारणा आहे. पण आपण शरीराचे अनेक भाग वेगवेगळ्या कार्यासाठी वापरतो. तोंडाचं कार्य खाणं आणि बोलणं असलं तरी चुंबन घेण्यास आपण वापर करत नाही का? हाताचा/बोटांचा उपयोग लोक वस्तु उचलण्यासाठी करतात. पण त्याचबरोबर अनेक जण हाताचा/बोटांचा उपयोग स्वतःला किंवा दुसऱ्याला शारीरिक सुख देण्यासाठी करत नाहीत का? निसर्गातले लैंगिक संबंध निसर्गाचा अभ्यास करताना प्राण्यांमध्ये विविध लैंगिक पैलू आढळून आले. सुरुवातीच्या काळातला हा अभ्यास, सर्वेक्षणं पूर्वग्रहदूषित होती. प्राणी, पक्षांची समलिंगी जोडपी संभोग करताना दिसली तर- ती खेळत आहेत, पुढच्या भिन्नलिंगी आयुष्याची तयारी करत आहेत असे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून चुकीचे निष्कर्ष अनेक वेळा काढले गेले. जेव्हा निकोप दृष्टीने सर्वेक्षणं व्हायला लागली तेव्हा निसर्गात लैंगिकतेचे अनेक पैलू दिसून आले. जो समज होता की निसर्गात फक्त भिन्नलिंगी संबंध, नाती दिसतात ही धारणा साफ चुकीची ठरली. अनेक प्राण्यांमध्ये समलैंगिकता, उभयलैंगिकता आढळून येते. चिंपांझी, गोरिला, हनुमान लंगूर, बॉटल नोज डॉल्फिन, ग्रे देवमासा, ग्रे सील, पांढऱ्या शेपटाचे हरीण, जिराफ, हत्ती, शेळी, सिंह, चित्ता, अमेरिकन बायसन, ग्लॅग गुस, काळा बगळा, मॅलर्ड बदक, रिंग बिल्ड गल, फ्लेमिंगो, पेंग्विन, पाईड किंगफिशर इत्यादी प्राण्यांत समलैंगिकता आढळते. [39] मॅनहॅटन च्या सेंट्रल पार्क प्राणिसंग्रहालयामध्ये अनेक समलिंगी पेंग्विन्सची जोडपी आहेत. त्यातील रॉय आणि सिलो नावाच्या नर पेंग्विनचं एक समलिंगी जोडपं आहे. या दोघांच्या घरट्यात एक गोल दगड ठेवल्यावर त्यांनी तो उबवण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी रॉब ग्रॅमजे यांनी तो दगड काढून एका पेंग्विनचं सूपीक अंड ठेवलं. या दोघांनी ते उबवलं व टँगो ही मादी पेंग्विन जन्माला आली. तिला या दोघांनी प्रेमाने वाढवलं. [40प्राण्यात अशा त-हेची अनेक समलिंगी जोडप्यांची उदाहरणं आढळतात. काही ठिकाणी प्राण्यांची जोडपी दिसत नाहीत पण समलिंगी संबंध दिसतात. हनुमान लंगुरांबद्दल सायमन ली व्हे लिहितात "हनुमान लंगूर माकडांच्या, गटाच्या काठावरच नर आणि मादी माकडांमध्ये खूप प्रमाणात समलिंगी संबंध दिसून आले. दोन नरांच्या समलिंगी संबधांमध्ये एक नर दुसऱ्या नराच्या शेपटीखाली वीर्यपतन होईपर्यंत इंद्रधनु ... ४४