पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, आणि दलितांच्या अधिकाराचे अनेक कायदे अस्तित्वात आलेच नसते, कारण अनेक समाजातील लोकांना हुंडा घेणं, स्त्रियांना मारहाण करणं, जातीभेद पाळणं हे संस्कृती, परंपरेनुसार बरोबर वाटतं. [35] धर्मनिष्ठ राजकीय पक्षांचा समलिंगी संभोगाला मान्यता देण्यास उघडपणे विरोध आहे. समाजवादी पक्षांचा विरोध उघडपणे झालेला नसला तरी याचा अर्थ ते या बदलाला अनुकूल आहेत असा अर्थ लावणं चुकीचं होईल या प्रांतांत समलिंगी संभोग गुन्हा आहे. (२००७) (Map Source- http://www.sodomy.org) ३७७ कलमातून निर्माण होणारे कायद्याचे प्रश्न

  • लहान मुलांच्या लैंगिक शोषणावर वेगळे कायदे असावेत का?
  • संमती नसतातना केलेला गुदमैथुन किंवा मुखमैथुन बलात्कार मानायचा

का?; समलिंगी संभोगाला संमती असणं किंवा संमती नसणं या दोन गोष्टींना कायद्यानी एकाच मापदंडानी मोजणं बरोबर आहे का?

  • नैसर्गिक संभोगाची व्याख्या काय? जननेंद्रियांव्यतिरिक्त इतर शरीराचे अवयव

वापरून किंवा एखादी कृत्रिम वस्तू वापरून जोडीदाराबरोबर केलेला संभोग नैसर्गिक समजायचा का अनैसर्गिक? स्वत:बरोबर केलेला संभोग नैसर्गिक का अनैसर्गिक मानायचा? नैसर्गिक/अनैसर्गिक कोणी व कशाच्या आधारावर ठरवायचं? इंद्रधनु ४१ ...