पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • दोन व्यक्तींमधला संभोग आणि एक व्यक्ती व एका जनावराबरोबरचा संभोग

यांची तुलना होऊ शकते का?

  • या कायद्याला समांतर असलेला लष्करातील कायदा बदलावा का?

लहान मुलं व लैंगिक शोषण आतापर्यंत बहुतेक वेळा ३७७ कलम लहान मुली/मुला बरोबर केलेल्या मुखमैथुन/गुदमैथुनासाठी लावण्यात आलेलं आहे, कारण अशा प्रकारे झालेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणासाठी कायद्यात वेगळं कलम नाही. १९९० ते २००० या दशकात, ३७७ खलील जी प्रकरणं कायद्याच्या नजरेस आली त्यांचं विभाजन- पुरुष व स्त्री: १ प्रकरण, दोन पुरुष: ३ प्रकरणं, लहान मुली/मुलांबरोबर केलेला संभोग: १८ प्रकरणं. [36] म्हणून लहान मुलांच्या सगळ्या प्रकारच्या लैंगिक शोषणावर कायद्याने स्वतंत्र तरतुद करावी. संमती कायद्याच्या दृष्टिकोनातून बलात्कार म्हणजे पुरुषानी जबरदस्तीने स्त्रीबरोबर केलेला योनीमैथुन. नवऱ्याने बायकोवर जबरदस्तीने केलेल्या योनीमैथुनाला बलात्कार मानला जात नाही, तसंच इतर कोणतेही जबरदस्तीने केलेले लैंगिक संभोगाचे प्रकार बलात्कारात मोडत नाहीत. पुरुषानी जबरदस्तीने दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषावर केलेल्या गुदमैथुनाला, मुखमैथुनाला बलात्कार मानला जात नाही. स्त्रीने जबरदस्तीने दुसऱ्या स्त्रीवर केलेल्या मुखमैथुनाला बलात्कार मानला जात नाही. जबरदस्तीने केलेला संभोग हे नुसतं लैंगिककृत्य नसतं. शरीरसुखाच्या प्रबळ इच्छेव्यतिरिक्त, दुसऱ्या व्यक्तीची अवहेलना करणं, अपमान करणं, त्या व्यक्तीची अस्मिता नष्ट करणं असे अनेक उद्देश असू शकतात. (मग तो पुरुषानी स्त्रीवर केलेला असो अथवा पुरुषाने पुरुषावर केलेला असो.) म्हणून कोणत्याही व्यक्तीने जबरदस्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कोणत्याही भोकात आपली जननेंद्रियं घालण्याला बलात्कार मानला जावा. आताची कायद्याची बलात्काराची व्याख्या अपुरी आहे. या व्याख्येत सुधार होणं गरजेचं आहे. बलात्काराची व्याख्या बदलावी यासाठी 'साक्षी' संस्थेनी दिल्लीच्या हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. [37] या याचिकेवर सरकारने मत मांडलं की आताचं ३७५ कलम परिपूर्ण आहे. समजण्यासाठी सरळ, सोपं आहे. हे कलम जर विस्तारित केलं तर गोंधळ निर्माण होईल. इतर गुन्ह्यांसाठी (उदा. जबरदस्तीने केलेला गुदमैथुन) इतर कलमं आहेत. सरकारची बाजू कोर्टानी उचलून धरली. सरकारी . पक्षानी मांडलेलं मत कितपत बरोबर आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. , इंद्रधनु ... ४२