पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समजला जातो.

  • दोन मांड्यांमध्ये लिंगप्रवेश करून केलेल्या संभोगास ३७७ कलम लागू

होतं. संभोगाचा अर्थ Visiting organism being enveloped by visited organism' असा लावला जातो. यामुळे मांड्यांमध्ये लिंग घालणं हाही अनैसर्गिक संभोगाचा प्रकार [26]

  • एका व्यक्तीने मूठ करून त्या मुठीत दुसऱ्या व्यक्तीने त्याचं लिंग घालणं/

एका व्यक्तीनं दुसऱ्याचा हस्तमैथुन करणं हा अनैसर्गिक संभोग समजला जातो. [27]

  • पुरुषाने किंवा स्त्रीने जनावराशी कोणत्याही प्रकारचा संभोग करणाऱ्याला

कलम ३७७ लागू होतं. व्यक्तीचं वय सात वर्षापर्यंत वयाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणताही गुन्हा केला तरी तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा समजला जात नाही. 'गुन्हा' च्या व्याख्येचा अर्थ समजण्यास ती व्यक्ती अपात्र आहे अशी कायद्याची धारणा आहे. आठ ते बारा वर्षांच्या वयातल्या मुला/मुलींनी गुन्हा केला तर तो गुन्हा समजला जातो. या कायद्याची अंमलबजावणी जुव्हेनाइल कोर्टात करतात. ज्यानी गुन्हा केला आहे ती व्यक्ती 'मी काय करत होतो याची मला समज नव्हती' असा बचाव घेऊ शकते. त्याच्या वकिलाला हा बचाव सिद्ध करून दाखवावा लागतो. तेरा ते अठरा वर्षांच्या वयातल्या मुला/मुलींनी गुन्हा केला तर तो गुन्हा समजला जातो. या कायद्याची अंमलबजावणी जुव्हेनाइल कोर्टात करतात. जो गुन्हा करतो ती व्यक्ती 'मी काय करत होतो याची मला समज नव्हती' असा बचाव घेऊ शकत नाही. आठ ते अठरा वर्षाच्या गुन्हेगाराला दिलेली शिक्षा सौम्य असते, पुनर्वसनाकडे झुकलेली असते. त्याच्या दोन व्यक्तींमधल्या संभोगाचे प्रकार योनीमैथुन जर एका पुरुषाने एका १६ वर्षांच्या आतील मुलीबरोबर योनीमैथुन केला तर तो बलात्कार समजला जातो व कलम ३७५ लागू होतं (या वयात मुलीला संभोगासाठी संमती देण्याची प्रगल्भता नसते म्हणून तिची संभोगाला संमती आहे का नाही याला काही अर्थ उरत नाही). जर एका पुरुषाने १६ वर्षांवरील स्त्रीबरोबर जबरदस्ती करून योनीमैथुन केला (जर ती त्याची बायको नसेल तर) तर तो बलात्कार समजला जातो व कलम ३७५ लांगू होतं. इंद्रधनु . ३४