पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कायद्याचा दृष्टिकोन - कलम ३७७ - पूर्वीचे ब्रिटिश कायदे ख्रिस्ती धर्माच्या विचारसरणीने प्रभावित होते. एकेकाळी ब्रिटनमध्ये समलिंगी संभोग करणाऱ्या व्यक्तींना देहदंडाची शिक्षा देण्याचा कायदा होता. ही स्थिती सतराव्या शतकापर्यंत होती. जस जसा समाज बदलत गेला तस तसे कायद्यात बदल होत गेले, व हा कायदा बदलून समलिंगी संभोगास तुरुंगवास व दंडाची शिक्षा ठेवण्यात आली. ब्रिटिशांचं राज्य येण्याअगोदर भारतात अनेक राज्यं होती. प्रत्येक राज्याचे वेगवेगवेळे नियम होते. हळूहळू ब्रिटिश साम्राज्य पसरत गेलं व त्यांनी संपूर्ण भारतावर सत्ता मिळवली. सबंध भारतात एकच कायदाव्यवस्था लागू व्हावी या हेतूने त्यांनी त्यांच्या कायद्याचा आराखडा घेऊन भारतीय दंड संविधान तयार केलं. ही दंडविधान संहिता १८६० साली भारतात लागू झाली. या संहितेच्या कलम ३७७ नुसार समलिंगी संभोग करणं गुन्हा ठरला. कलम ३७७ (भारतीय दंडसंहिता) [24] जो कोणी निसर्गक्रमाविरुद्ध कोणत्याही पुरुषाशी किंवा स्त्रीशी किंवा प्राण्याशी इच्छापूर्वक शरीर संभोग करील त्याला आजीव कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल. (Note: The offence is cognizable, non-bailable, non- compoundable and is triable by Magistrate of the first class.) कायद्याची व्याप्ती

  • या कायद्यानुसार समलिंगी संभोग करणं गुन्हा आहे, समलिंगी असणं गुन्हा

नाही. याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीनी सगळ्यांसमोर सांगितलं की, तो समलिंगी आहे तर त्या व्यक्तीवर, ती व्यक्ती समलिंगी आहे. म्हणून कोणीही गुन्हा दाखल करू शकत नाही, पण त्या व्यक्तीने त्याच्या लिंगाच्या व्यक्तीशी संभोग केला तर तो गुन्हा ठरतो.

  • किंचित प्रमाणात तरी लिंगप्रवेश होणं गरजेचं आहे (वीर्यपतन होणं आवश्यक

नाही). समलिंगी संभोग करण्याच्या उद्देशाने नुसती चड्डी, लुंगी खाली ओढणं हे ३७७ कलम लागू होण्यास पुरेसं नाही. [25] 1 इंद्रधनु . ...