पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शीख धर्म कॅनडाच्या संसदेत जेव्हा समलिंगी लग्नाला मान्यता देण्याचं विधेयक मांडलं गेलं तेव्हा 'वर्ल्ड शीख फोरम'चे ज्ञानी जोगिंदर सिंग वेदांती यांनी शीख-कॅनडीयन संसद सदस्यांना आवाहन केलं की, त्यांनी समलिंगी जीवनशैलीला आधार बनणाऱ्या कायद्यांचा विरोध करावा. असे कायदे अस्तित्वात आले तर शीख लोक समलैंगिकतेला बळी पडतील. [20] ख्रिस्ती धर्म बायबल- लेव्हिटिकस [21] १८:२२ एखादा पुरुष स्त्रीशी शय्यासोबत करतो तशी त्याने दुसऱ्या पुरुषाबरोबर शय्यासोबत करायची नाही. हे निंध कृत्य आहे. २०:१३ एखादा पुरुष स्त्रीशी शय्यासोबत करतो तशी त्याने दुसऱ्या पुरुषाबरोबर शय्यासोबत केली तर त्या दोघांनी अत्यंत निंद्य कृत्य केलं असून (महापाप केलं असून) दोघांनाही मृत्युदंडाचीच शिक्षा दिली जावी. याच्या व्यतिरिक्त 'रोमन्स' (१:२६, १:२७), 'कॉरिनथियन्स् (६:९, ६:१०), ' टिमोथी' (I-१:९, १:१०), मधेही समलिंगी संबंधांबद्दल नकारात्मक भूमिका दिसते. इस्लाम धर्म

कुराण [22] ४:१६ तुमच्यातल्या दोघा पुरुषांनी कामुक कृत्य केलं तर दोघांनाही शिक्षा करा. त्यांना पश्चात्ताप होऊन त्यांचं वर्तन सुधारलं तर त्यांना सोडून द्या. परमेश्वर क्षमाशील आणि दयाळू आहे. ७:७६ तुम्ही स्त्रियांबद्दल कामवासना बाळगण्याऐवजी पुरुषांबद्दल तशी आसक्ती बाळगता. हा खरोखर तुमचा अधमपणा आहे. २६:१६६ देवाने तुमच्यासाठी निर्माण केलेल्या बायकांना सोडून तुम्ही पुरुषांशीच व्यभिचार कराल का? मग तुम्ही महापापीच ठराल. २७:४८ तुम्ही जाणूनबुजून व्यभिचार करता, स्त्रियांशी समागम करण्याऐवजी पुरुषांशी करता? मग खरोखर तुम्ही अडाणीच आहात. याच्या व्यतिरिक्त 'स्पायडर' (२९:२७) मध्येही समलिंगी संबंधांबद्दल नकारात्मक उल्लेख आहे. इंद्रधनु २९