पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" देण्यास तिला भाग पाडावे आणि तिला चाबकाचे दहा फटके मारावे. ८:३७०- मात्र जर एखाद्या प्रौढ स्त्रीने एखाद्या कुमारिकेबरोबर असे कर्म केले तर तत्काळ तिचे केशवपन करावे (डोक्यावरील केस पूर्णपणे काढावे) किंवा तिच्या बोटांपैकी दोन बोटे कापून टाकावी आणि तिची गाढवावरून धिंड काढावी. ११:६८- पुरुषाने धर्मगुरुला दुखापत करणं, मद्याचा किंवा तशा दुसऱ्या निषिध्द पदार्थाचा वास घेणं, कपटीपणा करणं आणि दुसऱ्या पुरुषाशी लैंगिक संग (समागम) करणं यामुळे परंपरेनुसार तो जातिबहिष्कृत होतो. ११:१७५- द्विज वर्णातल्या पुरुषाने (म्हणजे ब्राह्मणाने) अनैसर्गिक समजला जाणारा लैंगिक दुराचार केला किंवा एखाद्या स्त्रीशी बैलगाडीतून जाताना, पाण्यात किंवा भर दिवसाउजेडी संभोग केला तर त्याने त्यानंतर सचैल स्नान करायला हवं. नारद स्मृती [17] पुरुष व स्त्रीचं नातं- या भागात चौदा प्रकारच्या लैंगिक विविधता दिल्या आहेत. यात समलैंगिकतेचा उल्लेख आहे. स्त्रियांनी अशा (समलिंगी व्यक्ती व इतर काही प्रकारच्या लैंगिकता असलेल्या) नवऱ्याला सोडून द्यावं असं नमुद केलं आहे. बौद्ध धर्म बौद्ध धर्माचे जे पंचशील आहेत त्यातला तिसरा आहे- [18] ३) लैंगिक व्यभिचार न करणं. इथे लैंगिक व्यभिचाराची व्याख्या स्पष्ट नाही, पण समलिंगी संभोग करणं तिसऱ्या शीलाचं उल्लंघन आहे असं मानलं जातं. (काही गे आणि लेस्बियन कार्यकर्त्यांना १ जून १९९७ साली तिबेटच्या दलाई लामांची भेट घेऊन समलैंगिकता आणि बौद्ध धर्माबद्दल संवाद साधायची संधी मिळाली. त्यावेळी दलाई लामा म्हणाले की, समाजाने समलिंगी लोकांचा अव्हेर करणं चुकीचं आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. [19]) जैन धर्म जैन धर्मात लग्नाच्या चौकटीतच पुरुष व स्त्रीमधल्या लैंगिक संबंधांना मान्यता आहे. इंद्रधनु ... २८