पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋणनिर्देश 1 मला अंधारातून उजेडाकडे आणणारी 'त्रिकोण' संस्था (सॅन फ्रेंन्सिस्को, कॅलिफोर्निया) तिचे आधारस्तंभ अरविंद कुमार, अशोक जेठनंदानी आणि संदीप रॉय; भारतात मला मोलाचं मार्गदर्शन करणारी, माझ्या संस्थेला आर्थिक आधार देणारी 'हमसफर' संस्था आणि तिचे विश्वस्त अशोक राव कवी, विवेक आनंद यांच्या ऋणातच मी कायम राहू इच्छितो. मी पुण्यात समलिंगी लोकांसाठी संस्था सुरू करताना मला पुण्यात विश्वस्त मिळत नव्हते. अशा वेळी मुंबईचे नितीन करानी, अभिजीत अहेर हे विश्वस्त बनले. यांचे मनापासून आभार! मला पुस्तक लिहिताना अनेकांची मदत लाभली. संध्या गोखले, अमोल पालेकर, ओनीर, सलीम किडवई, रुथ वनीता, गीती थदानी, जमीर कांबळे, राणी सोनावणे, अनिल कदम, मिलिंद चव्हाण, श्रीधर रंगायन, सागर गुप्ता, सुहेल, शुभांगी देशपांडे, केतकी रानडे, नयन कुलकर्णी, उज्ज्वला मेहेंदळे, डॉ. आनंद देशमुख, किरण मोघे (अखिल भारतीय जनवादी महिला संघटना) यांचा मी मनापासून आभारी आहे. डॉ. भूषण शुक्ल, डॉ. हेमंत आपटे, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. जया सागडे, डॉ. अरविंद पंचनदीकर, डॉ. मंगेश कुलकर्णी, नितीन करानी, नयन कुलकर्णी यांनी माझ्या पुस्तकाचा कच्चा आराखडा वाचून मला मोलाच्या सूचना दिल्या. याच्या व्यतिरिक्त मला सुनीता वाही, डॉ. विजय ठाकूर, डॉ. अनंत साठे, डॉ. शांता साठे, चंद्रा कन्हाडकर, अनुराधा करकरे (कृपा फाऊंडेशन), मेघना मराठे, पवन ढाल (साथी संस्था), डॉ. अनुराधा तारकुंडे, डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. रमण खोसला, डॉ. सौमित्र पठारे, एमआयएमएच (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ) च्या संचालिका डॉ. अलका पवार, डॉ. मयूर मुठे, आनंद पवार (सम्यक), सीमा वाघमोडे (कायाकल्प), अरविंद नारायण, गिरीश कुमार (हमसफर ट्रस्ट), संजय शेळके, नंदिता अंबिके, डॉ. राजीव बांबळे, संतोष वाणी (पुणे सिटी एडस् कंट्रोल सोसायटी), मनोज परदेसी (एनएमपी+), डॉ. ललित सरोदे, गीता राव, डॉ. पूजा यादव, प्रकाश यादव (अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था), आनंद ग्रोव्हर (डायरेक्टर लॉयर्स कलेक्टिव्ह एचआयव्ही/ एड्स युनिट), विवेक दीवान (लॉयर्स कलेक्टिव्ह), सी.वाय.डी.ए., पाथफाईंडर इंटरनॅशनल, लॉयर्स कलेक्टिव्ह यांचा आधार मिळाला. प्र. न. भारद्वाज यांनी काही इंग्रजी उताऱ्यांची भाषांतरं केली. कामात व्यस्त असूनसुद्धा वेळ काढून अंजली मुळे इंद्रधनु , " 1 १२