पान:इंदिरा.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रीवेषोपहास - नामक सर्ग चवथा. - श्लोक. अस्ता अतां जात असे गभस्ती; नक्षत्र बिंबें गगनीं उदेती, छाया पडोनी रजनीकराची, पूर्णेदु-रश्मी दिपवीति प्राची. १ ह्मणे इंदिरा:- “हो चला जाउं आतां बहू भ्रांत झालों नगामाथिं येतां; करूं या फळाहार; डेयांत जावूं, सुखाची घडी घालवृं, भक्ष्य सेवूं". २ नगापायथ्याशीं उभा तंबु होता; दिवे लागले तैं रवी अस्तिं जातां; तयांचेवरी दृष्टि ठेवोनि नारी कड्याखालिं येती, श्रमे जीव भारी. ३ उतरति करिं कोणी मैत्रिणीला धरोनी; प्रियअनुचरिलागीं कोणि घे सांवरोनी; पकडुनि तरु-वल्ली पाउलें कोणि टाकी; सरसर कुणि धांवे, पायिं विद्युल्लता कीं. ४ अशा सर्व येवोनि डेण्यांत नारी, तिथे बैसल्या मांडुनी चार हारी; पुढें शोभतें अन्न नानाप्रकारीं, बहू थाट शोभे, श्रमा सर्व हारी. ५