पान:इंदिरा.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्मणे इंदिरा तैं:-"कुणी गीत गा हो ? मृदू गानिं आनंद कर्णास लाहो!” तदा एक घेवोन सारंगि पाणीं, करी गायनारंभ मंजूळ वाणी: - ६ - पद. राग जोगी. ताल धुमाळी. कां ( "जाते की मम शकुंतला ही" - या चालीवर.) अश्रू हे नयनीं येती ! कांहिंच समजेना. शक्ति वरें अशि स्फूर्ती दिधली कां तरि ही त्यांना! ॥ध्रु०॥ हृदयीं निराशा जागृत कां ही, नुरवी देहभाना ! कां मन्मन हें चंचळ झालें, न भुले धनमाना ! कां वैराग्य-कंटक नाशी या शरिरोद्याना ! काय जुने दिन गेले ह्मणुनी चळविती नयनांना. ७ अभ्रू० ७ कां पद. जिल्हा झिंझोटी. ताल त्रिवट. (“चंद्रकेतु रविवंशीं”—या चालीवर . ) परदेशा मित्र जाई जैसा तो प्रेमळ, जिवलगां लावि साऱ्या, अंतरिं ते हळहळ; तैसा तो पूर्वकाळ अजि अंता पावला; उदयातें नविन आला, कहर जनीं जाहला. ८ अंजनीगीत. मानव मरणोन्मुख तो होतां, कर्णी ये ना ध्वनि आयकितां, हालतां ये ना नेत्रपातां, गानें गळताती; ९