पान:इंदिरा.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढें चाललीं बोलतां ह्याचि गोष्टी, ह्मणे विश्व तो पाहुनी तेथ दृष्टीं- १४४ - “अशा सुप्रसंगीं, अशा सुस्थळीं या, किती मौज मित्रांसवें हो रमाया! किती स्वप्रियासंगतीनें मनाला महानंद होईल कामीजनाला!” १४५ "इंद्राचे भुवनापरी दिसतसे शोभा इथे सुंदरा, तत्त्वज्ञानि इथे रमोनि अवघे जाती" - वदे इंदिरा; “वार्त्ता कामिजनांचि येथ करिशी तूं व्यर्थ गे कासया ? कामाचा अमुच्या नसेचि नगरीमाजी मुळीं वास या.” १४६ दिंडी. तिणें आज्ञा मग केलि दासिंलागीं; तंबु मोठा ठोकला रम्य जागीं; गार चारीवर मधुर फळाहार करिति दासी तिथ सर्व तो तयार. १४७ नारि इतुक्यामधिं ठाई ठाई गेल्या; अद्रिशिखरावरि कोणि उभ्या ठेल्या; कमलजेच्या शशिवदन संगि आला, करीं धरि तो कमलाक्ष मधुकरीला. १४८ श्लोक. मार्गी जो उठला प्रचंड धुरळा, सर्वांग तैं माखिल्या अस्ताव्यस्त अशा समस्त महिला अद्रीशिरीं पातल्या; घामाचा मुर्खि लोट वाहत अशा साया तदा कोमळा शोभा देति, नगोटिं जेविं तनुला, तैशा तदा त्या स्थळा.