पान:इंदिरा.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( अज्ञान-बुद्धी जन तर्क खोटे कोणी कसे बोलति, जेविं वाटे; वाटे परी तें मजला असें कीं जें जें बधूं आपण विश्वलोकीं, १३८ | तें तें सुधारोनि परंपरेनें- दुःखी स्त्रियां सर्व यथाक्रमानें उत्क्रांति लाभो पुरि कालमानें ! ('देवी' ! ह्मणें 'मत्कृतिला यशा ने' ! यासाठिं मी स्त्रीसुखकारणीं जी योजीं उपायां हर-येक ! आजी ! माझ्या प्रमाणें कृति लोकिं कोणीं केली नसे! होउ स्त्रियां शिराणी ! १४० स्त्री-उन्नतीचा बसवोनि पाया, . आरंभिलें मुक्त स्त्रियां कराया; आतां उरे स्त्रीकरिं, शेषकार्या येवोत साह्याप्रति सर्व आर्या. १४१ विश्वंभरे देवि अगे ! सुबुद्धी देवोनि शक्ते ! करिं कार्यसिद्धी ! उद्युक्त केलें मम कार्यि माते ! पावो यशा कार्यचि उत्तमा तें ! १४२ हासोनि जावो, जशि इच्छितें मी, स्त्रीजातिची सांप्रतची गुलामी; अंतास जी सत्कृति शक्ति नेते साफल्य देवो श्रमियां स्त्रियां ते!" १४३ असें बोलली जें मनीं नित्य इष्ट, स्त्रियांचें सदा चिंतिते जी अभीष्ट; "युग्म"