पान:इंदिरा.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशा धीट नाहीं स्त्रिया आजि झालों; पदा नीच ऐशा न अद्यापि आलों; मना वीट येतो अशीं क्रूर कर्में बघोनी, घडों येति जीं गे अधर्में. १३२ विकृति जर किं येथें प्राप्त कोणाहि झाली, निजकरिं करूं सेवा, औषधी पाजुं वेली; हरगुणि उपचारां योजुं आह्मी विचारें, प्रकृति निजजनींची रक्षं साया प्रकारें. १३३ त्वां आद्य- विश्वंभर- विश्वकर्ता याची असे योजिलि थोर वार्त्ता; जाणें, असे निर्मियलें विधीनें संपूर्ण विश्वा निजशक्तिमानें. १३४ हा बैबली लेख असे लिहीला- 'हो रे उजेडा !' - तायें तो उदेला; माना न माना अशि बैबलोक्ती, देशोधडीं अन्य विचार होती. १३५ काळावरी ठेवियले जगा ना उत्क्रांतिच्या दीर्घ परंपरांना; निर्माण प्राण्या निजहेतु केलें; तैं प्राणियां जीवन प्राप्त झालें. १३६ एक्या अवच्छेदिं विधी-कृतीनें जें होय, तें ना वढुं ये मुखानें; विश्व अतर्क्या करणी असे ती ! जी माणसांना न कळोनि येती ! १३७ १ तो = उजेड= प्रकाश. Let there be light.