पान:इंदिरा.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ विधात्यानें केलें अंवतुनि तसें पूर्णचि घडे; विधात्या श्रेणीनें स्वकृति करण्या भाग न पडे; ह्मणा ऐसें कीं हो ! 'निजकृति जसा माणुस करी ऋमें, काळें, धाता स्वकृति मनुजांवाणि सुधरी ?" १२६ वदे इंदिरा तैं – “बहू तूं हुशार ! न ठावा शरीरोन्नतीचा प्रकार; पुरी तत्त्वशास्त्राज्ञ तूं भासशी गे ! कुठें जाहलें प्राप्त हें ज्ञान सांगें ! १२७ दिंडी. अगे शास्त्रे इथ शिकवितसों सारीं, सुगम करुनी तीं; स्त्रियां बहु विचारीं असों उत्तेजन देत प्रेमभावें; ह्मणों शास्त्रां इथ सारियां पढावें." १२८ श्लोक. तदा वोलला चंद्रकेतू तियेला- "नसे शारिराचा गुरू पाहियेला ?" वदे इंदिरा तैं- “न शारीरवेत्ती इथे येउं देऊं; प्रयोजी अघा ती ! १२९ सजो तो प्रकार प्रतापी नरांतें; न शोभे कदाही मवाळू स्त्रियांतें; नरांनींच त्या पातकी-शस्त्र - घातें ससे, श्वान, यांतें चिरावें स्वहातें. १३० शिरा, वाहिन्या, स्नायु, संधी, त्वचा-यां हृदा काळजा रक्तपिंडादिकां त्या, चिरावें स्फुरोनी, भरावें द्रवांनीं, पहावें कसे होति व्यापार त्यांनीं. १३१