पान:इंदिरा.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ गड गड गड शब्दें नीर वाहे निरोगी; थर थर थर कंपे अद्रि तो जागजागीं; घव घव घव नादें पल्लवीं वायु खेळे; पट पट पट वारू पातले तेचि वेळे. १२० नाना सुरंगी तट धोंडियांचे देती सुशोभा, जिथ नीर नाचे; पाहोनि स्थूलास्थि तिथे गजांच्या, उत्क्रांति-शास्त्रा कथि ती सुवाचा:- १२१ "जैशा सांप्रत दांडग्या दिसति गे! आह्मांप्रती अस्थि चा, तैशाही दिसतील अस्थि अमुच्या काळांत होणारिया; आडाणी स्वयं दांडगें असत जें विश्वांत, कालान्वयें उत्क्रांती-नियमें हि उन्नतदशा त्या प्राप्त होवोनि ये. १२२ जुने प्राणि गेले, नवे प्राणि आले; नवे गे ! जुन्यांहूनि ते श्रेष्ठ झाले; तशाही पुढें जन्मुनी श्रेष्ठ नारी अह्मां पाठिं येतील ज्ञानी विचारी." १२३ साकी. ऐकुनि ऐसें राजबाळिचें भाषण नृपतनयानें उत्तर केलें समयोचितसें, नमूनि बहु विनयानें, चंचळबुद्धी तो, । अपुल्या ज्ञाना दाखवितो-१२४ श्लोक. “असें बोलतां येतसे हीण देवा; विधाता कसा पूर्णज्ञानी ह्मणावा, कृती जो करी पायरी-पायरीनें, स्वकार्य करावें जसें मानवानें ? १२५