पान:इंदिरा.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ दिंडी "तुला वाटे गे असों आह्मि दुष्ट, व्यर्थ झालों त्या नरांवरी रुष्ट; परी जाणशि तूं किती भोगुं कष्ट ! असे झालें स्वातंत्र्य सर्व नष्ट ! ११५ देह अर्पू हा कार्यसिद्धिलागीं; बुडी डोहाच्या मारुं अधोभागीं; तप्त पाषाणावरी चालुं वाट, जरी कार्याचा सिद्धि जाय थाट. १९६ 57 श्लोक. परी कठिण फार हैं दिसत कृत्य सारें असे; क्षणांत परिपूर्ण तें घड्डुनि सर्व येई कसें? झिजेल जरि जाति गे सकळ नित्य या नारिंची स्वतंत्र जगिं होणिया, तरि तयांस लागे रुची."११७ असें बोलतां कंठ दाटे तियेचा, मुखीं दावि हेतू असे जो मनींचा; गळे नेत्रपातींहुनी अश्रुबिंदु, मुखा शोभवी, शुक्र तो जेविं इंदु. ११८ जातां जातां गोष्टि ऐशा करोनी, आलीं, जेथें पर्वताच्या वरोनी पाषाणाच्या पृष्ठभागीं प्रचंड नादें मोठ्या कोसळे नीर थंड. १९९