पान:इंदिरा.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ कधीं ती फळप्राप्ति होईल, होवो; उभारीयलें कृत्य त्या श्रेय येवो; मुळारंभिं कोणी तरी पाहिजे तें श्रमाया, तरी श्रेय यत्नेंहि येतें. १०९ सहस्र वर्षे जरि वांचलें मी, चिंता असे काय, अशा सुकामी माझेंच ना मीं फळ पाहियेलें ? आरंभिलें कृत्य, कृतार्थ झालें. ११० आयुष्य मी वेंचिन या सुकृत्या; जें दुःख स्त्री भोगि, हरीन मी त्या; ज्या आमुच्या मागुनि येथ येती, ही चालवीतील कृती सुरीतीं. १११ स्त्रियांमाजी आहे कमतरपणा काय इतुका ? स्वसत्कार्यो आह्मां अणु तरि श्रमाया बळ नका ? जरी दैवें शक्ती असति दिलि आह्मांसि अणुही, स्त्रियांच्या स्वातंत्र्याप्रति उलथितों पृथ्वि अजि ही." ११२ ऐकोनि ऐसे रिति भाषणाला, केलें न तेणें तिज उत्तराला; संदेह दाटे मनिं राजपुत्रा जिंकी अशा कोणचि प्रेमपात्रा. ११३ मनोवृत्ती त्याची घडिंत तिजला सर्व कळली; सती न्याहाळोनी, मग निजमुखें काय वदली; अहो ऐका आतां, कशि समयिं त्या योग्य वचना महा युक्ती लावी निज- जनित - सत्कार्य - अवना:- ११४