पान:इंदिरा.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० जरामरण त्यांप्रती भवनदींत बाधा करी; क्षणांत सुख जातसे, जरि तयांस मृत्यू हरी; अगे सुखद पूर्ण तीं, जरिच वांचती लेंकुरें; अकाळिं गत जाहल्या, जननिसौख्य कैंचें उरे ? १०३ अगे हे विषाचे बहू गोड गोळे- मुलें पाहतां धन्य होतात डोळे – परी सौख्य देती कितीकांस सांग; किती पुत्रशोकें हृदीं होइ आग ! १०४ किती बाळकें होति हीं दुःखकारी, दुराचार त्यां लागतां दुर्विकारी! कसा आइचा होइ तैं आसभंग ! कसें विंधतें तैं तिचें अंतरंग ! १०५ मुलांपायि लागे किती काळजी ती ! मुलांची असे केवढी घोर भीती ! मुलांपाय कैसा पतीपत्निमाजी बखेडा पडे, येइ दोघांस लाजी ! १०६ नको बाळकें तीं; नको घोर त्यांचा; नको दुःखजंजाळ त्या गे! नरांचा; क्रिया आमुची ही असे सौख्यदायी; जगीं मुक्त होऊं अशा गे उपायीं. १०७ नगे लौकिकासाठिं हें काम हातीं धरीलें; नसे आस आह्मांप्रती ती; असे पेरिलें बीज तें योग्य जागीं; निघे वृक्ष जो, वाढवूं त्याजलागीं. १०८