पान:इंदिरा.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ सदा आनंदानें पहुडत असे पाळणि सुखी; जसे वाढे, तैसें मधुवचन बोले मधुमुखीं; पडे, रांगे, लोळे, दुडदुड कसें धांवत असे ! कसें हाका मारी जनकजननींतें मधुरसें !" ९८ ह्मणे राजबाळा:-“पुरे वल्गना या; न का लाज वाटे इथे हें वदाया ? मतीहीन तूं शुद्ध आहेस भासे, भले मोतिदाणे मुखें येति खासे ! ९९ भली धीट तूं गे; न कोणीहि दूजी कदा बोलली, बोलसी गोष्ट तूं जी; परी सत्य आहे, अगे लेंकुरांची असे आवडी पूर्ण आह्मांसि साची. १०० पद जिल्हा झिंजोटी-ताल त्रिवट. (“बस्त्रानें देह सारा" या चालीवर - ) मधुर हीं फार आह्मां आवडती बाळकें; निर्मिलीं सौख्यकार्थी जगताच्या पाळकें; मधुरवचें मृदुहास्यें पितरां तीं तोषिती; लालित्या अंत नाहीं, गृहसुख सदा पोषिती. १०१ श्लोक. करावें तया आवडीलागि काय ? नसे आमुचे हातिं कांहीं उपाय; न कां बालकें हीं स्वयें सिद्ध होती ? - वनींच्या तृणासारखीं जन्मि येती? १०२