पान:इंदिरा.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ जरी आयु होई पुरें ना तयाला, तरी योग्य द्यावें करीं तें दुज्याला; दिसे ना कुणी येथ दूजी अशी कीं करी आपुल्यापाठिं हें कृत्य लोकीं. ९२ (जसें पावला वाळुमाजी बघावें, जसें सागरापृष्टिं लेखा लिहावें, |ढगावारिया हातिं घेण्या पहावें, जसें अग्निमाजी तृणा नीवडावें, ९३ “युग्म” तशि कृती इथ मांडियली असे, उघड आचरणें इथच्या दिसे; बघुं कृती किति हो दिन ही चले; (नरसुखावरि खड्ड धरीयलें. ९४ न जाणों हो काळेंकरुनि तुमची नूतन कृती तुझांपाठीमागें झणि सकल पावेल लय ती; अशा कृत्यें वाढे जरिहि तुमची कीर्ति जगतीं, तरी सौख्या देखा कितिक युवती येथ सुकती. ९५ स्त्रियां बहुत जें असे प्रिय, मुकाल साया तया- मुलें, सुखद संपदा, बहुत गोड जीं सारियां, इथे कुठुन वाढती ? पृथिवि काय ती देइल ? लतातरुवरी फुलें फुलति तेविं का येतिल ? ९६ न होती लग्नें जैं, तिथ उगम बाळांस कुठला ? गृहाच्या सौख्याचा प्रमुखचि झरा एक सुकला; अहो आयुष्यों का प्रियतर असे बालकसम - ? हंसावें, खेळावें, इतर वळखी तें, न नियम. ९७