पान:इंदिरा.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"युग्म" धिक्कारयुक्त वदली– “नुमजें विवाहा; ना अर्पिणार कवणा कधिं याचि देहा; कां स्त्री जनें चुकुनियां निजजीवनातें द्यावें नरा सकळही मुकुनी सुखातें ?" ८६ तदा वदे तो तिज राजपुत्र- "स्त्रिया कधीं होतिल का स्वतंत्र ? प्रचंड हें काम करीं धरीतां, शिरीं असा भार कशास घेतां ? ८७ अखंड जो मार्ग असे प्रचारीं, तथा तुझी पाडितसांचि हारीं; जरी असे योग्य विचार, सारा कसा तडी जाइल हो पसारा ? ८८ (जरी हें तुझां हातुनी होय सारें बहू युक्तिनें, योग्य बुद्धिप्रकारें, न जाणों तुह्यांमागुनी ज्या सुनारी कृती चालवायास येती नरारी, ८९ कसे रीति त्या, कोणच्या बुद्धिमानें कृती चालवीतील कोण्या मनानें, न तें सांगतां आजी ये हो कुणाला; (असो ही तरी काळजी आपणाला. ९० जगीं जें बरें सर्व वेंचूनि ध्यावें, ह्मणोनी अलभ्याप्रती कां झिजावें- महत्कार्य तें कां जरी स्वीकरावें, तरी पूर्ण तें हो स्वयेंची करावें. ९१