पान:इंदिरा.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ दिंडी. काय बोलावें अशा हो प्रसंगी ? राजतनयें कीं स्वयें ऐन रंगीं रूप दाउनि आक्षेप तो वदावा, विवेकानें वा धीर कीं धरावा ? ८० असे त्याच्या मनिं बहु विचार आले; गिळत चावत मग इंदिरेसि बोले- "असे ओळख त्या राजकुमाराची; गोष्ट जाणें मी लग्न योजिल्याची. ८१ जसा मानी तो, तशा पूर्ण आहां; गर्क होइल तो देह पाहतां हा! जरी ऐके आपुल्या मानसाला, अंत आणी तरि स्वयें तो जिवाला." ८२ श्लोक. "दीन बापडा!" वदत इंदिरा- “मानिती खुळा असलिया नरा; नाद तो फुका धरुनियां मनीं घे करोनियां हंसवणें जनीं. ८३ नसे काय विद्या कला ज्ञान त्यातें ? कशा गांजवी आपुल्या तो जिवातें ? न कां ज्ञानसंपादनीं काळ घाली ? अगे ज्ञान ये कामिं तें सर्व काळीं. ८४ न कां शूरवीरांपरी आयु लावी ? असे अंगिं जें तें जना शौर्य दावी ? जरी बाइलेच्या पडे नित्य घोरीं, गमे बाइला तो असे निर्विचारी." ८५