पान:इंदिरा.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिच्या सांगातें त्या परम विनयें राजकुंवरें तुरंगा ठेवीलें जवळ तिचिया बाजु निकरें; असा साया मार्गी तिज निकट चाले गजगती; मनीं ईर्षा ही कीं कळवुं तिजला मानसरती. ७५ वदली तथा ती "तुमच्या सखीला झिडकारुनी म्यां अवमान केला; तथिं दुःख वाटे जरि कां तुझांला, समजा तसा खेद मलाहि झाला." ७६ दिंडी. “नव्हे मैत्रिणिचा”; कुंवर बोलियेला- "परी त्याचा अवमान असे झाला, गोष्ट ज्याची म्यां कथिलि आपणाला, मागताहे जो आपुल्या कराला. ७७ पद जिल्हा झिंजोटी. ताल त्रिवट. ( वस्त्रानें देह सारा - या चालीवर. ) चंद्रकेतु रविवंशीं कुळभूषण शोभतो, लग्नाला योग्य तुझी, हे इच्छा वाहि तो; नगरिंच्या नारि त्याच्या, आह्नि तया जाणतों; जोडपें दोघांचें हो, बहु शोभेल मानितों. ७८ श्लोक. बोले तदा त्याप्रति राजबाला- “ही पाहिजे गोष्ट पुन्हा कशाला ? दासी किं आलां मज मागण्यातें ? सांगा पुरें कायचि एकदा तें." ७९ १ इंदिरा छंद श्लोक ६.