पान:इंदिरा.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ साकी. शशीकलेच्या भेटीचें हें शशिवदनानें केलें वृत्त निवेदन, इतुक्यामाजी तिथ आमंत्रण आलें; दासी उभि राहे । बोले- “राणि तुह्मां बाहे. ६९ श्लोक. अद्रि जो वसे उत्तरेकडे, नीर शुद्ध ज्या बाजुंनीं उडे, मौज इंदिरा तेथ दाविण्या ने तुझां, तरी जावयास या”. ७० हा निरोप त्यां दासि सांगुनी, आंवती तदा सर्व कामिनी; नेमल्या स्थळीं, काळिं योजिल्या, सर्व नारि त्या सिद्ध जाहल्या. ७१ कुमारें जयीं इंदिरा पाहियेली, अती शुभ्र साडी स्वयें शुद्ध ल्याली, उभें प्रेम राही तिच्या कारणें तें, प्रिया जाहली जी बहू काळ त्यातें. ७२ मग सर्व घोड्यांवरि बैसुनीयां सजल्या स्त्रिया त्या निघतात जाया; शिरिं पर्वताच्या अवघ्या चढाया करिती तयारी, किति धीट बायाँ ! ७३ कुणि एकटी जाय, न संगतीला दुजि घे; सर्वे घे कुणि मैत्रिणीला; निज अश्व नेला कुंवरें सकाम, तिजसंगिं जी त्यास असे विराम. ७४ १ इंदिरा छंद श्लोक ४. २ इंदिरा छंद श्लोक ५.