पान:इंदिरा.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३ ऐकोनी तिचि उक्ति यापरि जरी सारीहि आशा गळे, सोडीलें मुळिं आर्जवा तरि न म्यां, संकल्पही ना ढळे; जैसें तें पय थेंब थेंब पडुनी पाषाणही भेदितें, काळें जातिल वाटलें हृदिं तिच्या माझे तसे शब्द ते. ६३ ह्मणोनी युक्ती म्यां लढविलि गमे योग्य समयीं; ह्मणालों 'बाई गे ! घडिभर धरीं धीर हृदयीं; नको होऊं ऐशी निरवधि उतावीळ युवती ! अगे ऐकें वार्त्ता, निजमन करीं शांत सुमती ! ६४ मासुंदरशा उपस्थित तुवां केलें अर्धी या जरी, आरंभी जरि मुख्य तूं, हळु हळू झालीस गे दूसरी; आतां झालिस सांगती तिसरि तूं, त्याहूनही गे लघू नीचत्वा किति पावशील, तुज ना ठावें, पुरें हें बधूं. ६५ ऐकें गोष्ट अगे ! तुला विनवितों, उच्चा पदातें तुला नेऊं, यत्न करोनि आह्नि, जरि तूं पोटीं स्वयें गोष्टिला टेवोनी, अमुचा त्रिवर्ग नगरीं राहूं सुखी देशिल; मित्रातें वरि इंदिरा, जरि घडे, तो गे ! तुला तोषिल. ६६ बांधोनी तुज देउं स्त्रीपुर अगे अन्यत्र विस्तीर्ण सें, कीं नाहीं कधिं कोणि जन्मि अपुल्या कल्पीयलेंही असें; तेथें राज्य अखंड तूं करिशिल, प्राज्ञा कुणाची असे ? कीं येवोनि कुणे रितीं छळिल गे तूतें कदा राजसे'. ६७ परिसुनि वचना या माझिया स्तब्ध झाली, तिज फुस दिधली जी, ती विचारास आली; मनन करुनि मातें बोलली शांतवाणी- 'उतरत दिन भेटा, शब्द काढा न कोणी." ६८ ७