पान:इंदिरा.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ 'तुह्मां काय त्याचें' -मला बोलली ती- 'तयाची मला काळजी सर्वरीती; नसाव्या तुझांलागि पंचाइती या; स्वधर्मास जाणें, स्वकमें कराया.' ५८ मग बोललों मी-'जरि इंदिरेला अजि हाचि वृत्तांत कळोनि आला, करुं आझि संग्राम बळें स्थळीं या, हरुं इंदिरेला, धरुं जिंकुनीयां. ५९ साकी. कितीक जातिल प्राण हरोनी, होइल नाश जिवांचा, नगरींच्या गे विध्वंसानें लय होइल कार्याचा; समजा हेंचि मनीं । हांसें होइल सर्व जनीं.' ६० श्लोक. ती बोलली- 'जें रुचतें करावें, संग्रामिं, कीं हो कपटें धरावें, या राजबाळेस बळें वरावें, दासीपरी नित्यहि वागवावें. ६१ परी धर्म माझा न मी त्यागिणार; घडो जें घडे, इंदिरे सांगणार तिघांनीं जगीं या किं कापट्य केलें इथे भेदियांचें तयां साह्य झालें, " ६२ १ इंदिरावृत्त श्लोक ३ रा.