पान:इंदिरा.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आवेशानें बोलली हें मला ती - 'जें जें बोलां, गैर तें सर्वरीती; स्त्रीमंदीरीं पातलां गैर केलें; स्वप्राणांतें कांटिया लावियेलें.' ५२ उद्देशूनी बोललों द्वारलेखा- 'उल्लंघीली आझिं बुद्ध्याच रेखा; जें त्या योगें ये घडोनी घडो तें; पाहूं स्त्रीच्या हातुनी काय होतें. ५३ इथे आह्मी आलों समजुनि मनीं पूर्ण-' वदलों- 'बळी द्यावा लागे, ह्मणुनि मरणा पात्र ठरलों; जिवें आह्मांलागीं जरिहि तुझि माराल इकडे, तरी कार्याचे हो सकल तुमच्या होति तुकडे.' ५४ दिंडी. 'अणिक तुकडे हो काय व्हावयाचे ? दिसे'–वदली ती-'चिन्ह हो भिकेचें, शत्रु शिरले नर दिव्य नगरिमाजी; काय तोटा होणार अधिक आजी ! ५५. श्लोक. असे काय नाशास आतां उणें तें; इथे पक्षपातें सदा काम होतें.' तदा मी वदें - 'हें नको राजबाळे कळों वृत्त देऊं स्वयें आयकीलें. ५६ नको फोडूं गुह्या; सकळ कळल्या राजतनये, अहा बट्टा मोठा तव मधुकरीलागि उगि ये; असोनी ठावें कीं नर असुं, न ती बोललि परी; अशी कां पाडावी मुर्खि सकळिकांच्या मधुकरी ? ५७