पान:इंदिरा.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७०. साकी. शशिवदन तिथ आला तेव्हां, श्रांत बहू झालेला, हस्तद्वय मस्तकिं ठेवुनियां आळस तैं टाकीला, बोले- "कठिण घडी, । नाहीं शशिकले जोडी. ४६ दिंडी. पर्वताचे खोदितां ढीग येती; येति तोडीतां घोर अरण्यें तीं; लोह बाहुबळें वळवितांहि येई, वळेना ही पाषाणरूप बाई. ४७ श्लोक. शशिकलेचि त्या भेट घेतली, अति विनम्र म्यां भीक याचिली- 'उघड हैं कधीं कृत्य आपुलें करुं नये' असें तीस प्रार्थिलें. ४८ युक्तिप्रयुक्त मधु भाषणानें, प्रत्येक शब्दीं बहु आर्जवानें, आराधिलें म्यां जणुं देवतेला, कीं हा टळो आजि अघोर घाला. ४९ तैं शोध केला जन कोण आहों, कोठें असों जात, कुठेचि राहों, योजूनियां काय मनांत आलों, हा वेष कां आपण येथ ल्यालों. ५० कथिलि सकळ वार्त्ता साग्र, झाली असे जी; परिसुनी निजगुह्या जाहली नाहिं राजी; मग जयिं तव लग्ना योजुनी प्रश्न केले, चढवुनि भ्रुकुटींतें, विस्मया दावियेलें. ५१