पान:इंदिरा.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिसुनि ऐसें राजपुत्र तो बोले निजमित्राला - “योग्य तुझा हा विचार मित्रा ! मान्य मला तो झाला; बाळा गोड असे, । ह्मणशि जें तेंचि यथार्थ असे. ४० लोक. जसें भावे तैसें वदसि कमलाक्षा घडिस या; जया जैसें वाटे, निवड वधु तो पारखुनियां; मला साज्यांमाजी प्रियकर गमे राजतनया; जरी एका नादें भ्रमलि, तरि ती ग्राह्य हृदया. ४१ चातुर्यबुद्धी प्रचुरा किती ती! ऐसा पसारा घडवी स्वहस्तीं ! स्त्रीउन्नतीची धरि चित्तिं आशा छेदावया स्त्री जन दास्य-पाशा. ४२ शतपंडितां जिंकित जी प्रसंगी, शतयोद्धियांचें बळ शौर्य अंगीं, शतभास्करांचें शिरिं तेज शोभे, पिडलों अशा सुंदरिचेनि लोभे." ४३ दिंडी. असें बोलत अंगणा सोडियेले त्रिवर्गानें; मग गञ्चिवरी आले; संगमर्वरि खांबाशिं उभे ठेले, उत्तरेचा जिथ वायुवेग चाले. ४४ गंध केतकिचा जाइच्या वनींचा करी सुटुनी संतोष मानसाचा; गुलाबांच्या परिमळें व्योम कोंदे, बारमासहि जें पुष्प बागिं नांदे. ४५ १ इंदिरा वृत्त श्लोक २ रा.