पान:इंदिरा.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ एक्या भावें एक चित्तें स्त्रिया त्या सख्यानें या ग्रामिं राहात होत्या; बोले जें जें एक त्या नित्य दूजी हो हो बोले सर्वही कामकाजीं. ३३ कार्याकार्यो नित्य एका मतानें चाले सारें, दोघिंच्या विद्यमानें; मन्माता ती मत्सरीं अंतिं बोले, येतां स्पर्धी वैभवा सर्व नेलें. ३४ वदे माता ऐसें - 'सकल युवतींतें कमलजा स्ववर्गी नेवोनी, उपजवि तयां चित्ति समजा, स्थळीं अन्या जातां बिघडतिल की कोमळ मनें; असें चोरीयेलें मन सकळिकांचें कपटिनें. ३५ कमलजेप्रती ऐशिये रिती दुरितयुक्त हो माय माझि ती परम निष्ठुरा शब्द लाविते, तिजचि ही तिची उक्ति शोभते. ३६ साक्या. आतां जातें; वेळ जाहला, राहुनि येथें, भारी"- ऐसें बोलुनि धांवत गेली बाळा मानसहारी, जशि का चिडि उडली, । झडकर सुखकरि ती गेली. ३७ कमलाक्ष तिची गति न्याहाळुनि बोले “धन्या बाळा, वरणें जरि तरि अशिच वरावी सच्छीला वेल्हाळा; आहे गोड किती ! । शुद्धा केवीं ही चित्तीं. ३८ मदांध किती ती पहा इंदिरा, गर्वामाजि बुडाली ! कमलजाहि ती अशा स्त्रियेची दासी पूर्णचि झाली. बाळे जोड नसे, | मधुकरिसम इथ कोण दिसे?” ३९.