पान:इंदिरा.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ श्लोक. कमलाक्ष बोले, "वद केविं, बाले ! प्रमुखींमधीं भांडण काय झालें.” मनिं मोकळ्या ती वदली सुबाला- "बहु भांडणा काळ असेचि झाला. २९ अहो द्वैत हैं आंतुनि फार दीस असे माजलें; तें दुणे मास मास; असे माय माझी बहु द्वेषकारी, तयीं अंत ऐक्यास ये दुर्विकारी. ३० अहो भांडणारी असे वारियाशीं, ह्मणे पूर्ण होता पती मौर्यराशी; नसे पाहिलें म्यां कधीं बापड्याशीं, बहू सोसतें आइच्या जाचणीशीं. ३१ इंदिरा तिच्या हातिं वाढली, इंदिरेचि जैं माय वारली; आलि तूमची जैं सहोदरा, मानि तीजला श्रेष्ठ इंदिरा. ३२ १ या श्लोकाचें वृत्त नवें असून, तें साहजिक पडले आहे. याला इंदिरा वृत्त अशी संज्ञा दिली आहे. याचे लक्षण-पादाक्षरें १२; गण —स, य, स, य. मात्रा येणेप्रमाणे: V-11--||-|-|| या वृत्ताचे आणखी कांहीं श्लोक पुढे आले आहेत.