पान:इंदिरा.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नको कांपूं गे, नको गार होऊं, तुझ्या बदली हे स्वयें प्राण देऊं; काय ऐसें निस्तेज तुवां व्हावें ! तुझ्या तोंडा म्लानत्व कसें यावें ? २४ नको खेद करूं, क्षमा हवी काशा? निरपराध्याला कोण करी शिक्षा ? मायसंगें बोलतां म्लान झालें वदन, ह्मणुनी का तुवां पाप केलें ? श्लोक. ऐशा या नगरींत कांहिं दिन, गे ! आह्मीं वसावें गमे; इंद्राच्या भुवनांतरी मन न हें ऐसें कदाही रमे; जाऊं या नगरीस सोडुनि, तरी पावूं फजीतीप्रती; वैकुंठीं बसत्या जशी यमपुरी, होईल तैशी गती. २६ शशिकलेस या प्रार्थना करूं, दिवस कांहीं हें नाट्य निस्तरूं; जरि वळे, तरी सर्वकामना करिल पूर्ण ती, किंतु ना मना. २७ दिंडी. द्रवहि पाषाणा येइ विनवणीनें; काय अंतर तें, द्रवे न वाणीनें ? कार्यभागा या करावया जातों,” असें बोलुन शशि शीघ्र तैं निघे तो. २८ २५