पान:इंदिरा.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कशा इतुकि लाजशी; वद् किं ठाउकें जें असे. स्त्रिया असुनि दीसती पुरुषरूपि ऐसें कसें ? असेचि तुज ठाउकें दिसतसे तुझ्या गे मुखीं- तिघे पुरुष - साच हें - कमलजा तयांची सखी. १८ समागमिं तिघांचिया प्रहर होति ती बोलत; मुली! मजशि सांग, गा! असशि काय त्या जाणत. कशा लपविशी अगे, कळतसे मला स्पष्ट जें ? नको मजशिं सांगुं तूं-कपट तूज हें ना सजे.' १९. शब्द ना बदलें; मुखावरुनि तें आलें कळोनी सवें होतें घोळत काय अंतरतळीं- सायां न जें जाणवे- ऐशी ज्ञानलता प्रचंड वनिता माता मदीया मला माझ्या बुद्धिस नाडुनी, हृदयिंचा तैं व्याळ तो जाणला. २० प्रातःकाळिं उठोनि ती कळविण्या हे वृत्त त्या इंदिरे गेलीसे; नकळे मला अजि कसें होई, बहू घाबरें; सर्वस्वीं बुडली असे कमलजा, झाला तिचा नाश हो; जा येथून सवें, जिवा तुमचिया केशामिं पीडा न हो ! २१ गेल्याअधीं हो मज पापिणीला व्हावी क्षमा, म्यां अपराध केला; कैसें तुह्मां या वदनास दावूं ? कीं आग वाटे तनुलागि लावूं". २२ दिंडी. तदा शशिवदनें प्रश्न तिला केला, हंसत बोले करिं धरुनि सुंदरीलाः “काय भाषण गे करिशि मधुकरी हें ? काय केली कृति अशी तुझ्या देहें? २३