पान:इंदिरा.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ दिंडी. असा येथें क्रम उलट चाललाहे; नवी येतां जी कमलजेस पाहे, कमलजेच्या ती वर्गि जात आहे; हेंचि माये माझिया मुळिं न साहे. १२ श्लोक. बोले माता, 'येइ जी, तेथ जाई; झाली ती या कांचनीं गोड आई ! मातें कोणी काय नाहीं पुसावें ? होई जें जें, पाहुनी तें असावें.' १३ करिति माझि ती माय दुर्धरा, कमलजेचिया नित्य मत्सरा; बसुनि, रात्रिं ती चौकशी करी- 'कुठुनि पातलां या तुझी पुरीं. १४ बोले 'कशा या, किति भव्य बाया ! धेंडांप्रमाणे दिसतात काया ! भारी मला भासति दांडग्या या, माझ्या नको सन्निध ह्याचि बाया.' १५ 'स्वदेशभगिनी तिघी' कमलजा असे सांगत्ये; 'तिच्या तिजचि शोभती; मज नको, न मी मागत्यें'.- असें वदलि तैं मुखीं पळसपुष्पतुल्यप्रभा दिसे; भुजग तो मनीं भगिनिरोष राही उभा. १६ ह्मणे मजशि माय ती-'त्यजितसे असा कासया कपोलिं तुज रंग हा; गमत कीं न या गे स्त्रिया; कशा क्षणिंच गे अशी फिकट होशि सांगें मुली ? असे विदित काय गे कुठुनि हीं इथे पातलीं? १७