पान:इंदिरा.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३ साक्या. यत्न करुनि परि मधुकरि बाळी राजकुमारापाशीं घाबरलेली उभी राहिली, लागे धडक उराशीं. बोले गहिंवरली, । “मित्रा ! भ्रांति मला पडली!” ६ "धांवा धांवा !" ह्मणे सुबाळा "माता माझी जाणे कोण असा तुझि, काय कारणें झालें तुमचें येणें. आहें अपराधी, । मागें 'क्षमा करा आधीं' ७ येथुनि जा हो, नगरी सोडा, तुमचें कळलें वर्म; निज गुह्याचा घडा फोडिला, केलें अनुचित कर्म ! झाल्यें अपराधी, । कथितें 'क्षमा करा आधीं.' ८ हातुनि माझ्या गोष्टचि गेली, झाली षट्कर्णी ती; मित्रद्रोही ऐशि काळिमा, मजवरती हो आली ! आहें अपराधी, । तरि हो क्षमा करा आधीं. दिंडी. असे मातेची चाल माझिया कीं जरी कोणी ये नवी नारि-लोकीं, माय इच्छी तैं वर्गि तिच्या जावें; कमलजेला सर्वोनिंही त्यजावें. १० श्लोक. स्थापीली नगरी जयीं, अंवतिले ते काळिं, कीं इंदिरा राणी या नगरी असावि; तिचिया सव्यापसव्या करा मन्माता जशि तेविं ती कमलजा व्हाव्या समप्रीतिच्या; आतां ती प्रमुखा प्रिया कमलजा झाली मतें राणिच्या. १९