पान:इंदिरा.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संवादनामक सर्ग तिसरा. श्लोक. सहस्ररश्मी उदयासि आला, प्रभंजनें बाष्पतुषार गेला, प्रमोद झाला पशुपक्षियांला, प्रसन्न ते जाति चरावयाला. १ कारंजियांचे उडती फंवारे, लता तरूही नवपुष्पभारें शोभा वना देति सुरम्य सारीं, रंगें खुले अंबर तोषकारी. २ दिंडी. तिघे होउनियां उषःकाळिं जागे, (भयें निद्रा त्यां पूर्ण कैंचि लागे?) ईश प्राथुनि मुखमार्जनादि केलें; आपअपुलें स्त्रीवसन शुद्ध ल्याले. ३ श्लोक. जिथें कारंजांचें उडत जळ होतें सभवतें, उभे होते बागेमधिं तिथ तिघे एकवट ते; तुषारा पाण्याच्या निरखिति बहू ते सुखि मनीं; तदा आली बाळा मधुकरि तिथे म्लानवदनी ४ नसे निद्रा डोळीं अखिल तिचिया रात्रभर ती; तिघां पाहोनीयां खळखळ तिचे अश्रु गळती; भयानें चिंतेनें, सकल तनुला कंप सुटला, मुखावाटे ये ना ध्वनि मुळिं, असा कंठ सुकला. ५