पान:इंदिरा.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणि पडावीं बसुनि नदीवर उल्हासें त्या तरती, कोणी चारेवर पडती, कुणि चढती वृक्षावरती; ऐसें मंडळ तें । हर्षित क्रीडा वनिं करितें. २०३ कोणि मयूरासंगें खेळति, उडविति कारंजांतें; स्त्रीवेषी परि बैसुनि एक्या स्थळिं बघती मौजेतें; मिसळुनि जरि जाते, । वळखलें तरि तैं त्यां असतें. २०४ पद. राग, देस. ताल त्रिवट. कलिया भीनन जाय-या चालीवर. सुमनें वेंचित जाय; कुमारी तीनसांज वेळीं ॥ सुमनें वेंचित जाय ॥ ध्रु० ॥ कुसुमें वेंचुनि उभी ठाकली, | शोभे सुंदर नार; प्रेमा मनिं त्या राजकुमारा उठे, नवल तें काय ? १ सुमनें० २०५. श्लोक. सायंकाळ समीप येउनि जयीं व्योमीं सतेज ग्रह सौंदर्यै गगनास शोभविति ते होवोनि सौख्यावह, निद्रास्थानिं प्रवेशती युवति त्या साऱ्या सुवेळीं तया, देवी प्राथुनि जागजागिं पडती निद्रा सुखें घ्यावया. २०६ ज्ञान वेंचतां श्रांत जाहल्या, झोंप घ्यावया सर्व चालल्या; देविमाय ती आठवोनियां मागती - "करीं माय गे दया ! २०७ कार्य जाउं दे सर्व सिद्धिला; देइं गे बळा शुद्ध बुद्धिला; स्त्रीजनांस तूं देई गे यशा; स्त्रीजनीं असे झालि दुर्दशा!" २०८ सर्ग दुसरा समाप्त. ६